Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दुबईचे क्राउन प्रिन्स आज भारत दौऱ्यावर, मुलीचे नाव हिंद ,जाणून घ्या त्याची एकूण संपत्ती

Sheikh Hamdan India Visit : दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ते 8 एप्रिल रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. दुबईचे क्राउन प्रिन्स म्हणून हमदान यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे.

शेख हमदान हे लग्झरी लाइफ जगण्यासाठी ओळखले जातात. अशा परिस्थितीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा होते. अलिकडेच त्यांनी त्याच्या मुलीला दिलेल्या नावामुळे तो भारतात चर्चेचा विषय बनला आहे. हमदानने आपल्या मुलीचे नाव 'हिंद'असं ठेवले आहे.

dubai crown prince sheikh hamdan

दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांनी गेल्या महिन्यात आपल्या मुलीचे स्वागत केले. त्यांनी आपल्या मुलीचे नाव हिंद बिंत हमदान बिन मोहम्मद अल मकतूम ठेवले. हे त्यांचे चौथे अपत्य आहे. शेख हमदानने 2019 मध्ये शेखा शेखा बिंत सईद बिन थानी अल मकतूमशी लग्न केले आहे. प्रिन्स हमदानला मे 2021 मध्ये रशीद आणि शेख ही जुळी मुले झाली. फेब्रुवारी 2023 मध्ये हमदानला मोहम्मद नावाचा मुलगा झाला.

दुबईचे क्राउन प्रिन्स म्हणून हमदान यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. त्यांच्यासोबत अनेक मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उच्चस्तरीय व्यावसायिक शिष्टमंडळ असेल. तसेच, पंतप्रधान मोदी मंगळवारी प्रतिष्ठित पाहुण्यांच्या सन्मानार्थ दुपारचे जेवण आयोजित करतील. क्राउन प्रिन्सचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशीही बैठक घेण्याचा कार्यक्रम आहे.

महत्वाच्या मुद्द्यावर होणार चर्चा

दिल्लीनंतर, क्राउन प्रिन्स मुंबईला भेट देतील आणि दोन्ही बाजूंच्या प्रमुख व्यावसायिक नेत्यांसोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत सहभागी होतील. या संवादामुळे भारत-यूएई आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्य मजबूत होईल. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "पारंपारिकपणे, दुबईने भारताच्या युएईसोबतच्या व्यावसायिक, सांस्कृतिक आणि लोक-लोकांच्या देवाणघेवाणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. क्राउन प्रिन्स यांच्या भेटीमुळे भारत-युएई व्यापक धोरणात्मक भागीदारी मजबूत होईल आणि दुबईसोबतचे आपले बहुआयामी संबंध अधिक दृढ होतील."

शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हे 2008 पासून दुबईचे क्राउन प्रिन्स आहेत. जुलै 2024 मध्ये त्यांची युएईचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली. 2006 ते 2008 पर्यंत त्यांनी दुबईचे उपशासक म्हणून काम पाहिले. दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद दुबईच्या रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी काम करत आहेत. हमदानने जगभरातील अनेक घोडेस्वारी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

घोडेस्वार असण्यासोबतच, हमदान एक स्कायडायव्हर आणि स्कूबा डायव्हर देखील आहे. ते अरबी भाषेतील त्याच्या रोमँटिक आणि देशभक्तीपर कवितांसाठी देखील ओळखला जातात. तसेच त्यांच्या कविता फजा या नावाने प्रकाशित करतात. शेख हमदान सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहेत. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 16.8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

क्राउन प्रिन्सची एकूण संपत्ती

दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांना 2008 मध्ये क्राउन प्रिन्स बनवण्यात आलं आहे. 2024 मध्ये त्यांना दुबईचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. दुबईचे क्राउन प्रिन्स हे महागड्या छंदांसाठी जगभर ओळखले जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 400 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच 33,500 कोटी रुपये आहे.

शेख हमदान यांनाही आलिशान गाड्या खूप आवडतात. त्याच्या सोनेरी मर्सिडीज कारच्या एका झलकसाठी लोक वेडे आहेत. याशिवाय त्याच्याकडे फेरारी, लॅम्बोर्गिनी, सुपरयॉट आणि खाजगी जेट देखील आहे. दुबईमध्ये त्याचे अनेक शाही राजवाडे आणि फार्महाऊस आहेत, ज्यामध्ये 1000 हून अधिक घोडे, 120 उंट आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+