ट्रक ड्रायव्हरला दारुची झिंग; भीषण अपघातात चिमुकल्यासह सात जणांचा बळी, सहा गंभीर
भरधाव जाणाऱ्या ट्रकने ऑटो रिक्षाला ओव्हरटेक करताना झालेल्या भीषण अपघातात चिमुकल्यासह सात जणांचा मृत्यू झाला. रिक्षाला ओव्हरटेकच्या नादात या ट्रकमधील लोखंडी राँड रिक्षावर पडले व रिक्षाचा जागीच चेंदामेंदा झाला. हे राँड रेल्वे ट्रॅकवर अंथरण्यासाठी घेऊन जात असतानाच हा अपघात झाला. विशेष म्हणजे ट्रक ड्रायव्हर दारुच्या नशेत होता, अशी माहितीही आता समोर आली आहे.

कसा झाला अपघात?
हा अपघात तेलंगणामधील वारंगल जिल्ह्याच्या वारंगल - मामुनुरू रस्त्यावर झाला. रेल्वेच्या ट्रॅकसाठी लागणारे लोखंडी रॉड घेऊन एक ट्रक भरधाव वेगाने जात होता. ऑटो रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्र्कमधील लोखंडी रॉड निसटले. ते ऑटो रिक्षावर जाऊन आदळले. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मृतांचा आकडा वाढणार
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं या अपघातातील जखमी व्यक्तींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की लोखंडी राँड पडल्यावर रिक्षाचा पार चुराडा झाला. मृत व जखमींनी रिक्षातून ओढून बाहेर काढावे लागले.
ट्रकचालक नशेत
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात जेव्हा घडला तेव्हा या ट्रकचा चालक दारूच्या नशेमध्ये होता. तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर जे सहा जण गंभीर जखमी आहेत. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामध्ये दोन ऑटो रिक्षाचा चुराडा झाला आहे, ट्रकचा चालक हा दारूच्या नशेत असल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.












Click it and Unblock the Notifications