Diwali 2025 :दिवाळीला या रंगाच्या फुलांनी देवी लक्ष्मीची पूजा करा, तुमच्या घरात नेहमी राहिल आनंद!
Diwali 2025 lakshmi puja flowers color significance : हिंदू धर्मात दिवाळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी प्रत्येक घरात धन, समृद्धी आणि सौभाग्याची देवता असलेल्या देवी लक्ष्मी आणि विघ्नहर्ता भगवान गणेश यांची विशेष पूजा केली जाते.
अनेक दिवसांपासून या पूजेची तयारी, स्वच्छता आणि सजावट सुरू असते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी-गणेशाची सजावट, अन्नदान आणि विशेषतः फुले अर्पण करण्याचे मोठे महत्त्व आहे.

देवी लक्ष्मीचे आवडते फूल कोणते?
असे मानले जाते की दिवाळीच्या रात्री विशिष्ट रंगाच्या फुलांनी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास तिचे आशीर्वाद अनेक पटीने वाढतात आणि घरात कायम आनंद, समृद्धी, संपत्ती आणि शांती नांदते. दिवाळीच्या पूजेसाठी खालील फुले अत्यंत शुभ मानली जातात:
कमळाचे फूल!
कमळाचे फूल हे देवी लक्ष्मीचे सर्वात आवडते फूल आहे. देवी लक्ष्मी स्वतः कमळावर विराजमान आहे, त्यामुळे हे फूल तिच्या कृपेचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मी पूजनाच्या वेळी कमळाचे फूल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. एवढेच नव्हे, तर जर पूजेच्या वेळी देवी लक्ष्मीची मूर्ती कमळाच्या फुलावर ठेवली तर घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही, अशी श्रद्धा आहे.
पिवळी आणि लाल झेंडूची फुले!
पिवळ्या आणि लाल रंगाची झेंडूची फुले देखील दिवाळीच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी अत्यंत शुभ मानली जातात. पिवळा रंग सूर्य आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. लाल रंग शक्ती आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो. या फुलांनी घर आणि मंदिर सजवल्याने सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते.
भगवान गणेशासाठी विशेष फुले
ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीला कमळ आवडते, त्याचप्रमाणे भगवान गणेशाला काही विशेष फुले अर्पण करणे शुभ मानले जात.
लाल फुले : भगवान गणेशाला लाल रंगाची फुले अर्पण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
पिवळी फुले : पिवळ्या रंगाची फुले देखील गणेशाला प्रिय आहेत.
पूजेतील इतर महत्त्वाच्या गोष्टी
देवी लक्ष्मीच्या सजावटीत सिंदूर आणि कुंकू यांचे विशेष महत्त्व आहे. तर भगवान गणेशाला हळद, चंदन आणि सिंदूर लावून सजवले जाते. फुले वातावरण शुद्ध करतात आणि देवी लक्ष्मीला आकर्षित करतात, म्हणून त्यांचा वापर पूजेत आवर्जून करावा.
दिवाळी 2025 : पूजेचा शुभ काळ व पद्धत!
दिवाळीच्या रात्री प्रदोष काळ (सायंकाळी ६:३० ते रात्री ८:३०) हा लक्ष्मी आणि गणेशाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो.
- पूजेपूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ ठेवा.
- पूजेच्या वेळी उत्तरेकडे (North) तोंड करून लक्ष्मीची पूजा करावी.
- दिवा लावा, सुगंधित धूप (Incense) आणि अत्तर वापरा.
- लक्ष्मी स्तोत्र किंवा श्री सूक्त पठण करणे लाभदायक ठरते.












Click it and Unblock the Notifications