Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Digital Rape : डिजीटल रेप म्हणजे काय? एअर हाॅस्टेससोबत मेदांता हाॅस्पिटलमध्ये घडलेला हा प्रकार काय?

Digital Rape : मेदांता रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयसीयूमध्ये असलेल्या एका एअर होस्टेससोबत लैंगिक छळाची घटना घडली आहे. या प्रकरण दीपक नामक एका तंत्रज्ञाला अटक झाली आहे.

मेदांता रुग्णालयात जवळपास 800 सीसीटीव्ही आणि 50 पेक्षा अधिक जास्त स्टाफ आहे, तरीही ही लैंगिक छळाची घटना घडली. इकाॅनाॅमिक्स टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे, त्यानुसार, घटनास्थळी दोन परिचारिकाही होत्या पण त्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला नाही.

Digital Rape

संशयित आरोपी याच रुग्णालयात काम करतो आणि त्याने या एअर हाॅस्टेससोबत डिजीटल रेप केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती आहे, आता डिजिटल रेप म्हणजे काय हे ऐकूण प्रश्न पडला असेल ..चला तर डिजिटल रेप म्हणजे काय हे जाणून घेऊया.

काय आहे डिजिटल रेप? (Digital Rape)

नाव जरी डिजिटल असले तरीही येथे रेपसाठी कोणतीही तांत्रिक गोष्टीचा वापर केला जात नाही. डिजिटल बलात्काराची व्याख्या जर सांगायची झाली तर हाताची बोटं, पायाची बोटं किंवा टाचेचा वापर करुन एखाद्या व्यक्तीच्या खाजगी भागात तिच्या सहमतीशिवाय प्रवेश करणे असा याचा अर्थ आहे.

लैंगिक अत्याचारामध्ये बाह्य संपर्काऐवजी जो अंतर्गत संपर्क होतो तो डिजिटल बलात्कारामध्ये अंतर्भूत आहे. यामध्ये समोरच्या व्यक्तीची सहमती नसताना जबरीने खासगी भागात प्रवेश करणे, विशेषत: हात किंवा पायाची बोटे वापरणे याचा समावेश आहे, हे गंभीर कृत्य असून ते रुग्णालये, खाजगी घरे, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानक अथवा रेल्वेस्थान असो किंवा अगदी पोलिस कोठडीत असलेल्या वातावरणातही होऊ शकतात. डिजिटल बलात्कारामुळे खासगी भागाला शारीरिक हानी होऊ शकते, यासह पीडितांच्या मनावरही परिणाम होऊ शकतो.

किती होऊ शकते शिक्षा?

प्राप्त माहितीनुसार, डिजीटल बलात्काराची एकही तक्रार 2012 च्या आधी दाखल झालेली नव्हती.2012 मध्ये दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर हा मुद्दा महत्वाचा बनला. डिजिटल रेपमध्ये पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते किंवा ही शिक्षा दहा वर्ष अथवा आजीवन कारवासापर्यंत होऊ शकते.

याआधीच्या काही Digital Rape च्या घटना

  • 2013 मध्ये दिल्लीत युएस महिलेसोबत डिजीटल रेपचा प्रकार घडला.
  • 2016 मध्ये 4 वर्षीय मुलीसोबत गुरुग्राममध्ये बसमध्ये कंडक्टरने डिजिटल रेप केला होता.
  • 2017 मध्ये ऑटोरिक्षा चालकाने गजाच्या माध्यमातून महिलेवर डिजीटल रेप केला. ज्यामध्ये त्याला 20 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+