Dhirendra Shastri Net Worth : धीरेंद्र शास्त्रींकडे किती संपत्ती? एका कथेसाठी किती घेतात फी? वाचा

Dhirendra Shastri Net Worth : मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावातून देशात चर्चेचा विषय ठरलेले 'बागेश्वर धाम'चे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. त्यांच्या 'दिव्य दरबारा'साठी लाखोंची गर्दी उसळत असतानाच, सोशल मीडियावर त्यांच्या संपत्तीची आणि कमाईची मोठी चर्चा सुरू आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, धीरेंद्र शास्त्री यांची संपत्ती आणि कमाई एखाद्या सेलिब्रिटीला टक्कर देणारी आहे.

Dhirendra Shastri Net Worth

धीरेंद्र शास्त्रींची एकूण संपत्ती

वनइंडिया हिंदीने विविध आर्थिक विश्लेषणे आणि रिपोर्ट्सचा हवाला दिला, त्यानुसार, पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची एकूण संपत्ती १९ ते २० कोटी रुपयांच्या घरात आहे. कधीकाळी अत्यंत गरिबीत दिवस काढलेल्या या कुटुंबाकडे आज टोयोटा फॉर्च्युनरसारख्या आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. मात्र, धीरेंद्र शास्त्री स्वतः म्हणतात की, "माझी खरी संपत्ती म्हणजे माझे भक्त आणि सनातन धर्म आहेत."

एका कथेसाठी किती मानधन घेतात?

  • बाबा बागेश्वर एका कथेसाठी नक्की किती पैसे घेतात, याबाबत नेहमीच उत्सुकता असते.
  • फी (दक्षिणा): रिपोर्ट्सनुसार, ते एका कथेसाठी १ ते ५ लाख रुपये दक्षिणा म्हणून स्वीकारतात.

बागेश्वर धाम ट्रस्टच्या मते, बाबा कोणतीही ठरवून फी घेत नाहीत. आयोजक त्यांच्या श्रद्धेनुसार जे दान देतात, ते समाजकल्याणकारी कामांसाठी वापरले जाते. ते दरमहा सरासरी ३ ते ४ कथा करतात. त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरूनही दरमहा ४ ते ७ लाख रुपयांची कमाई होत असल्याचे सांगितले जाते.

कमाईचा पैसा जातो कुठे?

धीरेंद्र शास्त्री त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा लोककल्याणकारी कामांसाठी खर्च करतात.

१. निर्धन कन्या विवाह: धाममध्ये दरवर्षी भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जातो. अलीकडेच त्यांनी २५१ गरीब मुलींचे लग्न लावून दिले, ज्याचा संपूर्ण खर्च ट्रस्टने केला.

२. अन्नपूर्णा रसोई: बागेश्वर धाममध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी २४ तास मोफत अन्नाची व्यवस्था केली जाते.

३. कॅन्सर रुग्णालय: ४०० कोटी रुपये खर्चून एक अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे त्यांचे स्वप्न असून, त्यासाठी ते कथांमधून मिळणारे दान जमा करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+