आजचा दिवस काही बरा नाही ! दिल्लीत रेल्वेचा अपघात, रुळावरून डबा घसरला
गुरुवारी दुपारी दिल्लीतील शिवाजी ब्रिज स्थानकाजवळ एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. हजरत निजामुद्दीनहून गाझियाबादकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 64419 या लोकल गाडीचा चौथा डबा रुळावरून घसरला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ही घटना मध्य दिल्लीतील अतिशय गजबजलेल्या रेल्वे मार्गावर घडल्यामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. काही गाड्या उशिराने धावल्या तर काहींचे मार्ग वळवण्यात आले. आपत्कालीन प्रतिसाद पथके, ट्रॅक अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्यासाठी विशेष क्रेन्स मागवण्यात आले आणि तत्काळ सुरक्षिततेची कार्यवाही सुरू करण्यात आली.
Delhi: A train traveling from Nizamuddin to Ghaziabad, derailed near Shivaji Bridge station. The fourth coach of the train fell off the tracks. Authorities have reached the site, and further details are awaited as rescue and safety measures are being assessed. pic.twitter.com/2L9jq3OSbM
— IANS (@ians_india) June 12, 2025
उत्तर रेल्वेने या अपघाताची प्राथमिक चौकशी सुरू केली असून, ट्रॅकवरील दोष, यांत्रिक बिघाड किंवा सिग्नल चूक यांसारख्या संभाव्य कारणांची तपासणी केली जात आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते आणि संध्याकाळपर्यंत मार्ग पुन्हा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर हळूहळू रेल्वे सेवा पूर्वपदावर येऊ लागली.
या घटनेमुळे दिवसभर प्रवासी गाड्यांमध्ये विलंब झाला आणि प्रमुख स्थानकांवरून प्रवाशांना आवश्यक ती माहिती जाहीर करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचं आश्वासन दिलं असून, जबाबदारी निश्चित करून योग्य ती सुधारणा केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे.
दिल्लीच्या अतिवस्तीतून जाणाऱ्या या लोकल मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असल्याने या दुर्घटनेमुळे स्थानिक रेल्वे सुरक्षेच्या मुद्द्यांवर नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications