Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील घरावर पोलिसांचा छापा, आतिशीचा मोठा दावा

Bhagwant Mann News: दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐन थंडीच्या दिवसात दिल्लीचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. प्रचारासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. सर्वच पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारात व्यस्त आहेत.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने एक मोठा दावा केला आहे. या दाव्याने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी दावा केला आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी छापा टाकण्यात आला आहे.

Bhagwant Mann

फोटो सौजन्य- पीटीआय

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी दिल्ली पोलिसांनी हा छापा टाकला आहे. आम आदमी पक्षाने हा दावा अशा वेळी केला आहे, जेव्हा मुख्यमंत्री भगवंत मान सध्या दिल्लीत पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत.

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवारी 30 जानेवारी रोजी त्यांच्या अधिकृत x हँडलवर ही माहिती दिली आहे. आतिशी यांनी आपल्या सोशल पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'भाजपचे लोक दिवसाढवळ्या पैसे, बूट आणि चादरी वाटत आहेत - ते दिसत नाही. उलट ते निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी पोहोचतात. व्वा भाजपा! दिल्लीचे लोक 5 तारखेला याचे उत्तर देतील!' अशी पोस्ट केली आहे.

तक्रारीच्या आधारे छापा टाकण्यात आला

आतिशीच्या या दाव्यावर दिल्ली पोलिसांचेही निवेदन समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी असा कोणताही छापा टाकलेला नाही, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. निवडणूक अधिकाऱ्यांचे पथक छापा टाकण्यासाठी पोहोचले आहे. दिल्ली पोलिस फक्त मदतीसाठी आले असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांचेही प्रतिक्रिया समोर आली आहे. आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना अधिका-यांने सांगितले की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानावर टाकलेला छापा विनाकारण टाकण्यात आला नव्हता. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणताही नागरिक सी-व्हिजिल अॅपवर आदर्श आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार करू शकतो. तक्रार मिळाल्यानंतर फ्लाइंग स्क्वॉड टीम कपूरथळा हाऊस येथील कथित उल्लंघनाच्या ठिकाणी तात्काळ पोहोचली आहे.

भगवंत मान काय म्हणाले?

आज निवडणूक आयोगाचे पथक दिल्ली पोलिसांसह माझ्या दिल्लीतील कपूरथळा हाऊस येथील निवासस्थानी छापा टाकण्यासाठी पोहोचले आहे. भाजपचे लोक दिल्लीत उघडपणे पैसे वाटत आहेत. पण दिल्ली पोलिस आणि निवडणूक आयोगाला काहीही दिसत नाही. या सगळ्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. एक प्रकारे दिल्ली पोलिस आणि निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर पंजाबी लोकांना बदनाम करत आहेत, जे अत्यंत निषेधार्ह आहे, अशी भगवंत मान यांनी आपल्या सोशल मिडियावर केली आहे.

दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला निकाल

दिल्लीतील सर्व 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. 70 विधानसभा जागांसाठी एकूण 699 उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी रोजी संपत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+