स्वातंत्र्य दिनाच्या धर्तीवर खलिस्तान्यांचा कट! दिल्ली पोलिस 'हाय अलर्ट'वर
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनी खलिस्तानी संघटना कट रचत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी हायअलर्ट जारी केला असून 15 ऑगस्ट रोजी खलिस्तानी संघटना दिल्लीत ठिकठिकाणी खलिस्तानी घोषणा असलेले पोस्टर लावू शकतात. विशेष टार्गेट ठेवून खलिस्तानी दहशतवादी कृत्य करु शकतात, अशी गुप्त माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहेत.
दिल्ली पोलिस अलर्टमोडवर
खलिस्तान्यांचा गैरकृत्याच्या कटासंदर्भात गोपनिय माहिती मिळाल्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर दिल्ली पोलिस सतर्क झाले आहेत. दिल्ली पोलिस आयुक्तांनी याबाबत उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे.

या बैठकीनंतर दिल्ली पोलिसांचा विशेष कक्षही सुरक्षेच्या दृष्टीने कामाला लागला आहे. सुरक्षाव्यवस्था चोख ठेवून कोणत्याही स्थितीत 15 ऑगस्टच्या धर्तीवर गाफील राहायचे नाही म्हणून सुरक्षायंत्रणा दक्ष झाली आहे.
खलिस्तानी कारवायांत वाढ
भारतात खलिस्तान्यांकडून गैरकृत्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्या सुरुच असून राजधानी दिल्लीत अशा अनेक घटना अलिकडच्या काळात घडल्या. दिल्ली मेट्रोसह अनेक ठिकाणी खलिस्तानच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी स्वातंत्र्यदिनी सतर्कता वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. या संदर्भात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
संघटीत गुन्हेगारी, खंडणीचे नेटवर्क
पंजाब पोलिसांनी खलिस्तानींच्या नेटवर्कवर मागील काही दिवसांपुर्वी मोठी कारवाई केली होती. कॅनडात बसलेल्या खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग उर्फ लंडा याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी अटक केलेल्या लांडाचे साथीदार खंडणी नेटवर्क, शस्त्रास्त्रे, पाकिस्तानातून येणारे ड्रग्ज आणि इतर गुन्ह्यांमध्ये सामील होते.
दहशतवादी लखबीर लांडासोबत संबंध
पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या तिघांचे कॅनडामध्ये लपून बसलेल्या दहशतवादी लखबीर लांडासोबत संबंध आहेत. तिन्ही आरोपी संघटित गुन्हेगारी आणि खंडणीचे मोठे नेटवर्क चालवत होते. सर्व वस्तुस्थिती तपासल्यानंतर जालंधर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. त्याने सांगितले की, तीन आरोपींना प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांना संपवण्याचे काम विदेशी हस्तकांनी दिले होते.












Click it and Unblock the Notifications