Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Delhi New CM Atishi : आतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, दिल्लीच्या सर्वात तरुण CM

Delhi New CM Atishi Oath Ceremony : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची खूर्ची खाली झाली होती. त्यानंतर आपच्या नेत्यांनी आतिशी यांची एकमताने मुख्यमंत्रीपदासाठी निवड जाहीर केली. तर आज शनिवारी (दि.21) आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

लेफ्टनंट गव्हर्नर व्ही के सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर आतिशी या तिसऱ्या महिला दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री बनल्या आहेत.

पाच जणांची मंत्रीपदाची शपथ

आतिशी यांच्यासह आपच्या पाच आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन या चार जुन्या मंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय सुलतानपूर माजरा आमदार मुकेश कुमार अव्हालत यांनीही मंत्रिमंडळाचा नवा चेहरा म्हणून शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळातील सहावे मंत्रीपद रिक्त राहणार आहे.

atishi marlena

शपथ घेण्यापूर्वी केजरीवालांच्या घरी गेल्या

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी जाऊन केजरीवाल यांची भेट घेतली. यासोबतच मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या आमदारांनीही केजरीवाल यांची भेट घेतली. यानंतर सर्वजण आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासह राजभवनात दाखल झाले. या ठिकाणी मुख्यमंत्रीपद शपथ ग्रहण सोहळा पार पडला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+