तुर्कीला मोठा धक्का! हाय कोर्टाने फेटाळली सेलेबी कंपनीची याचिका; राष्ट्रीय सुरक्षा अन् नेमका वाद काय
Delhi High Court on Celebi Security Clearance Order : दिल्ली उच्च न्यायालयाने तुर्कीयेची कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला जोरदार धक्का दिला आहे.
सेलेबीच्या वतीने सुरक्षा मंजुरी रद्द करण्याच्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका करण्यात आली होती, परंतु ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
न्यायालयाने म्हटले आहे की, सरकारचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी आहे. त्यामुळे तुमची मागणी योग्य नाही, असे म्हणत त्यांनी याचिकाच फेटाळून लावली. ऑपरेशन सिंदूरनंतर कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली होती.

कंपनीने याचिकेत सरकारविरुद्ध काय केला आरोप?
ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने भारतात काम करणाऱ्या तुर्कीची कंपनी सेलेबी एव्हिएशन होल्डिंगची सुरक्षा मंजुरी रद्द केली होती. 21 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करताना सेलेबी कंपनीने युक्तिवाद केला की भारत सरकारचा हा निर्णय न्यायाच्या तत्त्वांविरुद्ध आहे. 15 मे 2025 रोजी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) ने सुरक्षा मंजुरी रद्द केली.
कंपनी भारतीय विमानतळावर काय काम करते?
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड देशातील विविध विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग आणि कार्गो टर्मिनल ऑपरेशन्सचे निरीक्षण करतात.
या कारवाईचा बचाव करताना, केंद्रीय प्राधिकरणाच्या वकिलांनी विमान वाहतूक सुरक्षेला अभूतपूर्व धोका असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
'राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी घेतलेला निर्णय'
सेलेबीच्या वकिलांनी सांगितले की, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या महासंचालकांनी याचिकाकर्त्यांना शिक्षा देण्यापूर्वी त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यायला हवी होती आणि कारवाईची कारणे सांगायला हवी होती.
केंद्राने 19 मे रोजी सांगितले की, मंजुरी रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी घेण्यात आला आहे, कारण सध्याच्या परिस्थितीत याचिकाकर्त्या कंपन्यांच्या सेवा सुरू ठेवणे धोकादायक ठरेल, असे गुप्तचर यंत्रणांकडून माहिती आलेली आहे.
15 वर्षाहून अधिक काळ करतेय भारतात काम!
सेलेबी 15 वर्षांहून अधिक काळ भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहे आणि 10,000 हून अधिक लोकांना रोजगार देते. ते नऊ विमानतळांवर त्यांच्या सेवा पुरवते.
बीसीएएसने त्यांच्या आदेशात म्हटले होते की, "राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी, सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संदर्भात सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द करण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications