..हे फसवण्याचे अन् बदनामीचे षडयंत्र! न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी कॅश प्रकरणातील आरोप फेटाळले
Delhi High Court Justice Yashwant Verma : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी रोख रक्कम सापडल्यानंतर चांगलीच खळबळ माजली होती, त्यानंतर या विषयाची माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, त्यानंरतर आता आरोप वर्मा यांना फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कधीही घराच्या स्टोअररूममध्ये रोख रक्कम ठेवली नाही असे वर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात लोकसत्ता डाॅट.काॅमने वृत्त दिले आहे, त्यानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. के. उपाध्याय यांना सादर केलेल्या उत्तरात वर्मा यांनी त्यांच्या घरातून रोख रक्कम आढळल्याचे आरोप हे स्पष्टपणे त्यांना फसवण्याचे आणि बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.

न्यायमूर्त वर्मा यांच्याकडून उत्तर
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्या अंतर्गत चौकशीचे आदेश दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी वर्मा यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. यावर न्यायमूर्ती वर्मा यांनी आपले उत्तर दाखल केले आहे.
नेमके काय म्हणाले न्या. वर्मा?
न्यायमूर्ती वर्मा यांनी आपल्यावरील आरोपाचे खंडन केले आणि स्पष्ट केले की, मला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आऊटहाऊस स्टोअररूमध्ये सापडलेल्या रोख रकमेबद्दल काही माहिती नव्हती आणि या रकमेचा माझ्याशी किंवा कुटुंबाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्या रात्री हजर असलेल्या माझ्या कुटुंबातील सदस्यांना किंवा कर्मचार्यांना अशी रोख रक्कम दाखवण्यात आली नाही.
न्या. वर्मा यांचा माध्यमांना सल्ला
न्यायमूर्ती वर्मा यांनी माध्यमांना सल्ला दिला आहे. माध्यमांनी आरोप करण्यापूर्वी आणि बदनाम करण्यापूर्वी थोडी चौकशी केली पाहिजे. आऊटहाऊस स्टोअररूमध्ये रोख रक्कम असल्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचेही म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
14 मार्चला होळीच्या रात्री 11.35 च्या सुमारास न्यायमूर्ती वर्मा यांच्या लुटियन्स दिल्लीतील निवासस्थानी आगीची घटना घडली. अग्निशमन विभागाने तातडीने प्रतिसाद देत आग विझवली, त्यावेळी आऊटहाऊस स्टोअररूमध्ये रोख रक्कम अर्धवट जळालेल्या स्वरुपात मिळाल्याचे बोलले जात आहे. जिथे या आरोपाचे न्या. वर्मा यांनी खंडन केले आहे.
जळालेल्या नोटांच्या पिशव्या दाखवल्या नाहीत
स्टोअर रुममध्ये जळलेल्या नोटांच्या कोणत्याही पिशव्या दाखवल्या किंवा देण्यात आल्या नाहीत. जे थोड्या प्रमाणात अवशेष वाचवण्यात आले होते ते अजूनही निवासस्थानाच्या एका भागात आहेत," असेही न्यायाधीश वर्मा म्हणाले यासह त्यांनी होत असलेले आरोप स्पष्टपणे धुडकावले आहेत.
त्या दिवशी मी घरी नव्हतो...
न्या. वर्मा यांचे म्हणणे आहे की,ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी आणि माझी पत्नी दिल्लीत नव्हतो आम्ही मध्य प्रदेशात प्रवास करत होतो. फक्त माझी मुलगी आणि आई या घरी होत्या. मी 15 मार्च 2025 च्या संध्याकाळी भोपाळहून माझ्या पत्नीबरोबर इंडिगोच्या विमानाने प्रवास करून दिल्लीला परतलो. मध्यरात्री जेव्हा आग लागली तेव्हा त्यांच्या मुलीने आणि खाजगी सचिवाने अग्निशामक दलाला कळवले आणि त्यांचे फोन कॉल्स रेकॉर्ड विचारात घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले.












Click it and Unblock the Notifications