21 ऑगस्टपर्यंत अटक करु नका, पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा
IAS officer Pooja Khedkar News : बडतर्फ झालेल्या माजी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणी पर्यंत पुजा खेडकर यांना अटक करू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले.
बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयानं पूजा खेडकर यांच्या अटकेला 21 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठानं खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.

पूजा खेडकर यांचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांना या प्रकरणात यूपीएससीला पक्षकार बनवण्यासाठी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालाने दिले. यानंतर लुथरा यांनी लवकरच अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं. पटियाला हाऊस कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी पटियाला हाऊस कोर्टानं पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
उच्च न्यायालयाने दिले हे निर्देश
नागरी सेवा परीक्षेत अतिरिक्त संधी मिळविण्यासाठी स्वत:ची खोटी ओळख करून दिल्याचा एफआयआरमध्ये आरोप आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपास यंत्रणेला तत्काळ अटक आवश्यक नसल्याने प्रकरण प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक करू नये, असे निर्देश दिले आहेत.
पदावरून बडतर्फ केले
पूजा खेडकर या 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी असून, स्वत:चे नाव, त्यांच्या वडिलांचे आणि आईचे नाव, फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि पत्ता बदलून ओळख बदलून नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यूपीएससीने त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवला होता, त्यामुळे त्याची उमेदवारी 31 जुलै रोजी रद्द करण्यात आली होती. तत्पूर्वी, संपूर्ण कट आणि इतरांचा संभाव्य सहभाग उलगडण्यासाठी कोठडीत चौकशीची गरज असल्याचे कारण देत दिल्ली न्यायालयाने खेडकर यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता.












Click it and Unblock the Notifications