Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Delhi Exit Poll 2025 : एक्झिट पोलमध्ये 'आप'ला मोठा धक्का, भाजपसाठी आनंदाची बातमी, सर्व अपडेट वाचा

Delhi Exit Poll 2025 Live : दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी आज 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान चालू राहणार आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 33.31 टक्के मतदान झालं आहे. दिल्लीच्या सर्व 70 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आज 5 फेब्रुवारीला सायंकाळी 6.30 वाजता एक्झिट पोल प्रसिद्ध झाले आहेत.

Delhi Exit Poll 2025

हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपाला स्पष्ट बहूमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्ली विधानसभेचा निकाल 8 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर होणार आहे. यावेळीही मतदार राजकीय विश्लेषकांना आश्चर्यचकित करतील की एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे?

8:24 PM, 5 Feb

Delhi Exit Poll 2025 Live: 50 पेक्षा जास्त जागांवर भाजपाला विजय मिळेल- भाजप उमेदवार रमेश बिधुरी

दिल्ली: कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रमेश बिधुरी म्हणाले, "ही मोदी लाट आहे... दिल्लीतील लोकांना विकास हवा आहे... मला या एक्झिट पोलवर विश्वास नाही, आमच्या जागांची संख्या आणखी वाढेल. भाजप 50 जागांचा आकडा ओलांडेल..."
7:59 PM, 5 Feb

Delhi Exit Poll 2025 Live : भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार- भाजप खासदार मनोज तिवारी

"एक्झिट पोलपेक्षा ही खूपच चांगला निकाल येईल... भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करणार आहे... मी दिल्लीतील जनतेचे आभार मानतो... आम्ही निर्णयाची वाट पाहू..."
7:54 PM, 5 Feb

एक्झिट पोलचे अंदाज : 'या' एक्झिट पोलने उडवली आपची झोप; वाचा नेमकी कुणाची सत्ता येणार?

एक्झिट पोलचे अंदाज : 'या' एक्झिट पोलने उडवली आपची झोप; वाचा नेमकी कुणाची सत्ता येणार?
                                                                       
7:33 PM, 5 Feb

'आप' पुन्हा सत्तेत येणार की भाजप सत्ता खेचून आणणार; जाणून घ्या- एका क्लिकवर 'पोल ऑफ पोल'

'आप' पुन्हा सत्तेत येणार की भाजप सत्ता खेचून आणणार; जाणून घ्या- एका क्लिकवर 'पोल ऑफ पोल'
                                                                       
7:31 PM, 5 Feb

Delhi Exit Poll 2025 Live : दिल्ली विधानसभा निवडणूकीत कोणत्या पक्षाला किती जागा

Delhi Exit Poll 2025 Live : दिल्ली विधानसभा निवडणूकीत कोणत्या पक्षाला किती जागा
दिल्ली विधानसभा निवडणूकीत कोणत्या पक्षाला किती जागा
7:28 PM, 5 Feb

Delhi Exit Poll 2025 Live : नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार परवेश वर्मा म्हणाले

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार परवेश वर्मा म्हणाले, "8 फेब्रुवारी रोजी कमळ फुलेल हे निश्चित आहे. आम्ही दिल्लीत सुशासन, स्वच्छ यमुना आणि रोजगार देऊ. अरविंद केजरीवाल यांना खात्री आहे की ते हरणार आहेत."
7:24 PM, 5 Feb

Delhi Exit Poll 2025 Live : व्ही-प्रीसाइड एक्झिट पोलनुसार भाजपाला दिल्लीत बहूमत

Delhi Exit Poll 2025 Live : व्ही-प्रीसाइड एक्झिट पोलनुसार भाजपाला दिल्लीत बहूमत
व्ही-प्रीसाइड एक्झिट पोलनुसार आप 18-23 भाजप 46-52 काँग्रेस 0-1 इतर 0-0
7:06 PM, 5 Feb

Delhi Exit Poll 2025 : दिल्ली विधानसभेचा पहिला एक्झिट पोल, जाणून घ्या- कोणत्या पक्षाला किती जागा

Delhi Exit Poll 2025 : दिल्ली विधानसभेचा पहिला एक्झिट पोल, जाणून घ्या- कोणत्या पक्षाला किती जागा
                                                                       
7:04 PM, 5 Feb

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा ?

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा ?
एक्झिट पोल निकाल लाईव्ह: टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये आप 22-31 भाजप 39-45 काँग्रेस 00-02 इतर-00
7:01 PM, 5 Feb

Delhi Exit Poll 2025 Live : दिल्लीत भाजपला 40 ते 44 जागा मिळण्याची अपेक्षा आहे-

Delhi Exit Poll 2025 Live : दिल्लीत भाजपला 40 ते 44 जागा मिळण्याची अपेक्षा आहे-
पीपल्स इनसाइड पीपल्स इनसाइड एक्झिट पोलचे आकडेही जाहीर झाले आहेत. ज्यामध्ये दिल्लीत भाजपला 40 ते 44 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर आम आदमी पक्षाला 25 ते 29 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर काँग्रेसला एक जागा मिळू शकते.
6:58 PM, 5 Feb

Delhi Exit Poll 2025 Live : पोल डायरी सर्वेक्षणानुसार दिल्लीत भाजपचं कमळ फुलणार

Delhi Exit Poll 2025 Live : पोल डायरी सर्वेक्षणानुसार दिल्लीत भाजपचं कमळ फुलणार
पोल डायरीनुसार, आम आदमी पक्षाला 18-25 जागा, भाजपला 42-50 जागा आणि काँग्रेसला 0-2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
6:52 PM, 5 Feb

Delhi Exit Poll 2025 Live : पी-मार्क एक्झिट पोल समोर

Delhi Exit Poll 2025 Live : पी-मार्क एक्झिट पोल समोर
पी-मार्क सर्वेक्षणाचा डेटा जाहीर झाला आहे, त्यानुसार यावेळी दिल्लीत आपला 21-31 जागा, भाजपला 39-49 जागा आणि काँग्रेसला 0-1 जागा मिळत आहेत.
6:48 PM, 5 Feb

Delhi Exit Poll 2025 Live : पीपल पल्स सर्वेक्षणात 'आप'ला मोठा धक्का

Delhi Exit Poll 2025 Live : पीपल पल्स सर्वेक्षणात 'आप'ला मोठा धक्का
पीपल पल्सच्या सर्वेक्षणात, यावेळी दिल्ली निवडणुकीत 'आप'ला 10 ते 19 जागा मिळत आहेत, तर भाजपला 51 ते 60 जागा मिळत आहेत. त्याच वेळी, काँग्रेस 0 जागा मिळतील असा वर्तवण्यात आला आहे.
6:43 PM, 5 Feb

चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीवर

चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला दिल्लीत 39 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, आम आदमी पक्षाला 25 ते 28 जागा मिळू शकतात. जर हा आकडा बरोबर ठरला तर अरविंद केजरीवाल यांच्या पक्ष 'आप'ला मोठा धक्का बसेल.
6:41 PM, 5 Feb

मॅट्रिक्स एक्झिट पोल समोर

मॅट्रिक्स एक्झिट पोल समोर
मॅट्रिक्स एक्झिट पोल समोर आला आहे.
6:39 PM, 5 Feb

एक्झिट पोलचा पहिला निकाल समोर

मॅट्रिक्स एक्झिट पोल समोर आला आहे. ज्यामध्ये 'आप'ला 32-37, भाजपला 35-40 आणि काँग्रेसला 0-1 जागा मिळताना दिसत आहेत.
6:19 PM, 5 Feb

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान संपलं

दिल्ली निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर आता वेळातच एक्झिट पोल येण्यास सुरुवात होईल. दिल्लीतील सर्व 70 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. आता संध्याकाळी 6.30 नंतर, सर्वेक्षण संस्था त्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध करतील.
6:04 PM, 5 Feb

एक्झिट पोल कोण प्रसिद्ध करते?

वृत्तवाहिन्या सर्वेक्षण संस्थांच्या सहकार्याने एक्झिट पोल आयोजित करतात. प्रत्यक्षात, मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल घेतला जातो, ज्यामध्ये फक्त मतदारांचा समावेश असतो. ज्याच्या आधारे मतदारांनी कोणत्या पक्षावर विश्वास व्यक्त केला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तथापि, एक्झिट पोलच्या अचूकतेबद्दल काहीही सांगता येत नाही.
4:18 PM, 5 Feb

Delhi Election Exit Poll 2025: दिल्ली विधानसभा निवडणुक एक्झिट पोल

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आज 5 फेब्रुवारीला सायंकाळी 6.30 वाजता एक्झिट पोल प्रसिद्ध होणार आहेत.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+