एक्झिट पोलचे अंदाज : 'हा' पोल सांगतो आपची सत्ता जाणार; भाजपचे २५ वर्षानंतर सत्तेत कमबॅक
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज सुरु झाले आहेत. हे अंदाज माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी धक्कादायक आहेत. पीपल इनसाईडसह इतर अनेक एक्झिट पोलनुसार भाजप दिल्लीतील सत्तेत कमबॅक करु शकते. अरविंद केजरीवाल यांच्या हातातून सत्ता जाऊ शकते. तब्बल २५ वर्षानंतर भाजपला दिल्लीत सत्तेत येण्याची संधी मिळताना दिसत आहे.

दिल्लीतील मतदान संपले
दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी मतदान सायंकाळी ६ वाजता संपले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७८ टक्के मतदान झाले. सकाळी ७ वाजल्यापासून मतदार आपापल्या मतदान केंद्रांवर रांगेत उभे होते. कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. अनेक ठिकाणी बोगस मतदानाचे आरोपही करण्यात आले होते, परंतु पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले.
एक्झिट पोलचे अंदाज सुरु
पीपल इनसाईडच्या अंदाजानुसार दिल्लीत भाजपला ४० ते ४४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर आम आदमी पार्टीला २५ ते २९ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसला एखादी जागा मिळेल, असेही या एक्झिट पोलचे म्हणणे आहे. या एक्झिट पोलनुसार केजरीवाल यांना १० वर्षानंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागणयाची शक्यता दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications