Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Delhi Election Result 2025 : निवडणूक आयोगाने मतदानाचा डेटा न दिल्याने केजरीवाल संतप्त, उचलले हे पाऊल

Delhi Election Result 2025 : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढच्या काही वेळात येणार आहेत, मतमोजणीसाठी आता थोडाच वेळ शिल्लक आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने मतदानाचा डेटा न दिल्याने मतमोजणीच्या अगदी आधी, आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे आणि प्रश्न उपस्थित केले आहेत.

केजरीवाल म्हणाले, 'त्यांच्या पक्षाने वारंवार विनंती करूनही त्यांनी फॉर्म 17 सी अपलोड करण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला.' आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर लिहिले की, 'वारंवार विनंती करूनही निवडणूक आयोगाने फॉर्म 17 सी आणि प्रत्येक विधानसभेतील प्रत्येक बूथवर झालेल्या मतांची संख्या
अपलोड करण्यास नकार दिला आहे.

Delhi Election Result 2025

आम आदमी पक्षाने transparentelections.in ही वेबसाइट तयार केली आहे ज्यावर आम्ही प्रत्येक विधानसभेचे सर्व फॉर्म 17 सी अपलोड केले आहेत. एवढेच नाही तर केजरीवाल यांनी पुढे लिहिले की या फॉर्ममध्ये प्रत्येक बूथवर टाकलेल्या मतांची संपूर्ण माहिती आहे.

दिवसभर, आम्ही प्रत्येक विधानसभा आणि प्रत्येक बूथचा डेटा सारणी स्वरूपात सादर करू जेणेकरून प्रत्येक मतदाराला ही माहिती मिळू शकेल. पारदर्शकतेच्या हितासाठी निवडणूक आयोगाने हे करायला हवे होते पण ते तसे करण्यास नकार देत आहेत हे दुर्दैवी आहे, असे यामध्ये नमूद आहे.

फॉर्म 17 सी म्हणजे काय?

1961 च्या निवडणूक आचारसंहीता कायद्याअंतर्गत, निवडणुकीदरम्यान मतदारांचा डेटा दोन स्वरूपात भरला जातो. पहिल्या स्वरूपाला 17 अ म्हणतात. ज्यामध्ये प्रत्येक बूथवरील मतदान अधिकारी प्रत्येक मतदाराची माहिती नोंदवतो आणि नोंदणीवर स्वाक्षरी देखील करतो. यानंतर, मतदानाच्या शेवटी फॉर्म 17 सी भरला जातो. फॉर्म 17 सी मध्ये मतदान केंद्राचे नाव आणि क्रमांक, ईव्हीएम आयडी क्रमांक अशी माहिती असते. समर्थित

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+