Delhi Exit Poll : 10 एक्झिट पोल पैकी 8मध्ये भाजपला दिलासा, AAPचा गड ढासाळणार?, वाचा सविस्तर
Delhi Exit Poll Results 2025 : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये विधानसभेची मतदानप्रक्रिया पार पडली असून आता एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाली आहे.
भाजप आणि आप या दोन पक्षांमध्ये जोरदार टक्कर असणार असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपची आपवर काहीशी सरशी असल्याचं दिसून येतंय. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक झाली असून 8 फेब्रुवारी रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे.
विशेष म्हणजे आज जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधून विविध संस्थांनी भाजपाला दिलासा देणारा निकाल दिला आहे. दहा एक्झिट पोलचा जर विचार तर त्यापैकी आठ एक्झिट पोलने भाजपची सत्ता स्थापन होऊ शकते, असा दावा केला आहे. तर दोनच एक्झिट पोल आहेत, त्यांनी आपचे सरकार पुन्हा स्थापन होण्याची शक्यता वर्तविली आहे.
निवडणूक निकालाच्या दिवशी जर भाजपला बहुमत मिळाले तर ते 27 वर्षांनी पुन्हा सत्तेत येईल. यापूर्वी 1993 मध्ये भाजप दिल्लीत सत्तेत आले होते.
पोल ऑफ पोल्समध्ये भाजपला 39, आपला 30 आणि काँग्रेसला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. जेव्हीसी आणि पोल डायरीने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये इतरांनाही प्रत्येकी 1 जागा मिळू शकते असा अंदाज वर्तवला आहे.

मॅट्रीजचा एक्झिट पोल
भाजप आणि आप यांच्यात चुरशीची लढत असणार आहे. या चुरशीच्या स्पर्धेत भाजप आपपेक्षा काहीशा अधिक जागा घेऊन सत्तेत येण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा : Delhi Exit Poll 2025 : दिल्ली विधानसभेचा पहिला एक्झिट पोल, जाणून घ्या- कोणत्या पक्षाला किती जागा
मतदानाची टक्केवारी कशी?
भाजप - 46% मते,
आप - 44% मते
भाजप - 35-40 जागा,
आप - 32-37 जागा-मॅट्रिझ
चाणक्य स्ट्रॅटेजीजचा एक्झिट पोल
भाजप- 39-44 जागा
आप- 25-28 जागा
काँग्रेसला - 2-3 जागा
पोल डायरीचा एक्झिट पोल
भाजप - 42-50
AAP - 18-25
कांग्रेस - 0-2
मतांची टक्केवारी कशी?
भाजप - 45 %
AAP - 42 %
हे ही वाचा : 'आप' पुन्हा सत्तेत येणार की भाजप सत्ता खेचून आणणार; जाणून घ्या- एका क्लिकवर 'पोल ऑफ पोल'
पीपल्स इनसाइटचा एक्झिट पोल
भाजप - 40-44 जागा
आप - 25-29 जागा
काँग्रेस - 0-1 जागा
P-Marq Exit Poll : पी मार्क एक्झिट पोल
भाजप - 39-49
AAP - 21-31
कांग्रेस - 0-1
वी प्रीसाईड एक्झिट पोल
भाजप - 46-52
AAP - 18-23
कांग्रेस - 0-1
मतांची टक्केवारी कशी?
भाजप - 49.2 %
AAP - 42.8 %
कांग्रेस - 5.1 %
विविध पोलकडून देण्यात आलेली आकडेवारी
- Channel/Agency BJP+ AAP+ INC+ OTH
- Matrize - BJP- 35-40, AAP- 32-37, OTH- 0-1 0
- Peoples Pulse- BJP - 51-60, AAP- 10-19, OTH- 0-0
- P-Marq : 39-49, 21-31, 0-1,
- Chanakya Strategies - 39-44 25-28 2-3 0
- JVC - BJP 39-45, AAP- 22-31, Con- 0-2, Oth- 0-1
- People's Insight - 40-44, 25-29, 0-1, 0
- Poll Diary - 42-50, 18-25, 0-2, 0
- Weepreside - 18-23, 46-52, 0-1, 0
- DV Research - 36-44, 26-34, 0, 0
- Poll of Polls - 38-44, 25-32, 0-2, 0-1,












Click it and Unblock the Notifications