Delhi Election 2025 : दिल्ली एक्झिट पोलची तारीख आणि वेळ काय; कधी आणि कुठे पाहायचे पोल्स? घ्या जाणून
Delhi Election 2025 Exit Poll Result Date and Time : दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. हे मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. यानंतर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल आणि त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केले जातील.
दिल्लीत कोण जिंकेल याची सध्यातरी कल्पना नाही. त्यामुळे सध्या अंदाज वर्तवण्याशिवाय काहीही नाही, असे असले तरीही एक्झिट पोल सर्वेद्वारे एक अंदाज लागतो,त्यामुळेच एक्झिट पोल हे महत्वाचे आहेत. हे पोल तुम्हाला कुठे पाहता येतील ते जाणून घ्या.

कधी येणार एक्झिट पोल?
- दिल्ली निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आज 5 फेब्रुवारीला सायंकाळी 6.30 वाजता एक्झिट पोल प्रसिद्ध होतील.
- दिल्ली निवडणुकीची मतमोजणी आणि अंतिम निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील.
Delhi Election 2025 : एक्झिट पोल कधी आणि कुठे पाहायचे
दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी मतदान प्रक्रीया पूर्ण होईल. त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून एक्झिट पोल प्रसिद्ध केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल पहायचे असतील, तर तुम्ही ते Oneindia च्या प्रत्येक प्लॅटफाॅर्मवर त्याचे अपडेट्स मिळतील. याशिवाय डेलीहंटवरही दिल्ली इलेक्शनसंबंधित क्षणा-क्षणाची माहिती तुम्हाला मिळणार आहे.
बहुमताचा आकडा 36 जागा
दिल्लीत एकूण 70 विधानसभा जागा आहेत. बहुमताचा आकडा 36 जागा आहे. जर भाजप आणि आप यांना समान जागा दिल्या गेल्या तर दोघांपैकी कोणीही दिल्लीत सरकार स्थापन करू शकते. भाजप 26 वर्षांपासून दिल्लीत सत्तेबाहेर आहे, तर आम आदमी पक्षाने 2015 आणि 2020 मध्ये विजय मिळवून दिल्लीत सरकार स्थापन केले आहे.
सकाळी 9 वाजेपर्यंत कुठे किती मतदान ?
- सकाळी 9 वाजेपर्यंत सेंट्रल दिल्ली : 6.67 टक्के
- पूर्वी दिल्ली : 8.21 टक्के
- नई दिल्ली : 6.51 टक्के
- उत्तर दिल्ली : 7.12 टक्के
- उत्तर पूर्वी दिल्ली : 10.70 टक्के
- उत्तर पश्चिमी दिल्ली: 7.66 टक्के
- शाहदरा: 8.92 टक्के
- दक्षिण दिल्ली: 8.43 टक्के
- दक्षिण पूर्वी दिल्ली: 8.36 टक्के
- दक्षिण पश्चिमी दिल्ली: 9.34 टक्के
- पश्चिमी दिल्ली: 6.67 टक्के












Click it and Unblock the Notifications