दिल्ली भूकंपाची तीव्रता 4.0, तरीही एवढ्या जोरात धक्के का बसले?, कारण आलं समोर; धक्कादायक VIDEO

नवी दिल्लीसह एनसीआर भागात आज पहाटेच्या सुमारास पाच ते साडे पाच वाजेच्या दरम्यान भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या भूकंपाची नोंद 4.0 रिश्टर स्केल अशी झाली. दरम्यान, या भूकंपाच्या धक्काने संपूर्ण दिल्लीकर खडबडून जागे झाले. तर लोकांमध्ये काही कळण्याआधीच खळबळ उडाली.

मुळात 4.0 रिश्टर स्केल अशी भूकंपाची नोंद झाली असली तरी हे धक्के अतिशय जोरात होते. इतके जोरात धक्के का बसले, याचे कारणही आता तज्ज्ञांनी सांगितले आहे. तसेच भविष्यातील धोक्याबाबत त्यांच्याकडून सूचना देण्यात आलेली आहे. दरम्यान, काही लोकांनी या भूकंपाच्या धक्काचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

Earthquake in Delhi-NCR Marathi News

इतक्या जोरात धक्के का बसले?, काय म्हणाले तज्ज्ञ!

दिल्ली एनसीआरमध्ये झालेल्या तीव्र भूकंपाच्या धक्क्याने लोक दशततीखाली जगत आहेत. एवढ्या जोरात धक्के का बसले, याबाबत आता तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली. आहे.

तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, उत्तर दिल्ली भूकंपाच्या केंद्रस्थान आहे. दिल्लीतील भूकंपाचे धक्के फक्त 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचे असले तरी आजच्या भूकंपाचे केंद्र नवी दिल्ली होते म्हणून तीव्रता फक्त 4.0 होती. भूकंपाचे केंद्र धौला कुआन येथील झील पार्क परिसरात होते. जमीन हादरली तेव्हा लोकांना मोठा आवाज ऐकू आल्याचे देखील सांगितले जात आहे.

ANI नुसार, पृष्ठभागाच्या 5 ते 10 किलोमीटर खाली येणारे उथळ भूकंप, पृष्ठभागाच्या खाली येणाऱ्या भूकंपांपेक्षा जास्त नुकसान करतात. आजचा दिल्ली भूकंप 5 किलोमीटर अंतराच्या खोलीवर नोंदविला गेला.

केंद्र नवी दिल्लीत असल्याचे मोठे धक्के जाणवले?

काही तज्ज्ञांच्या मते, बहुतेक प्रकरणांमध्ये, दिल्लीला हिमाचल, जम्मू आणि काश्मीर सारख्या उत्तर भारतीय प्रदेशात केंद्र असलेल्या भूकंपांचे धक्के जाणवतात. तथापि, यावेळी, केंद्र नवी दिल्ली होते आणि भूकंपाच्या जवळ असल्याने दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

दिल्लीत वारंवार भूकंपाचे धक्के का बसतात?

दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के वारंवार येतात यासंदर्भात देखील सांगितले जात आहे. यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी देखील दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचे कारण देखील समोरल आले आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सक्रिय भूकंपीय क्षेत्राचा भाग आहे. दिल्ली-एनसीआर प्रदेश हिमालयाच्या जवळ आहे, जो भूकंपाच्या दृष्टीने कायम अॅक्टिव्ह असतो.

दिल्लीच्या आसपास अनेक कमकुवत क्षेत्रे!

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीजवळ अनेक कमकुवत क्षेत्रे देखील आहेत. ज्यामध्ये दिल्ली-हरिद्वार क्वाड, महेंद्रगड-डेहराडून सबसरफेस फॉल्ट, मुरादाबाद फॉल्ट, सोहना फॉल्ट, ग्रेट बाउंड्री फॉल्ट, दिल्ली-सरगोधा कड, यमुना नदी सीमा रेषा या भागांचा समावेश होतो.

मोदींनीही चिंता व्यक्त केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आज झालेल्या भूकंपाबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच लोकांना शांततेत व सतर्क राहण्याचे आवाहन केले. तर प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+