मोठी बातमी! दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला! राजकीय क्षेत्रात खळबळ..
Delhi cm Rekha gupta attack during public hearing : राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज बुधवारी, २० ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला. सकाळी त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये सार्वजनिक सुनावणी घेत असताना ही घटना घडली. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे.

सार्वजनिक सुनावणीदरम्यान हल्ला
प्राप्त माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या आज सकाळी सार्वजनिक सुनावणी घेत होत्या, त्यावेळी त्यांच्यावर अचानक एका व्यक्तीने हल्ला केला. यानंतर एकच गोंधळ झाला, दरम्यान तातडीने पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेत अटक केली.
#WATCH | Attack on Delhi CM Rekha Gupta during Jan Sunvai | Shailendra Kumar says, "I had come from Uttam Nagar with a complaint over sewer. When I reached the gates, chaos broke out because the CM was slapped. This is wrong..." pic.twitter.com/dVIJhz6ipD
— ANI (@ANI) August 20, 2025
आधी शिविगाळ नंतर मुख्यमंत्र्यांना मारल्या चापटा!
वनइंडिया हिंदीनुसार,संशयित आरोपी मुख्यमंत्र्याजवळ सुनावणीदरम्यान आला त्याने मोठ्याने आरडा-ओरड केली.यानंतर मुख्यमंत्र्यांना त्याने थापड मारली आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला.
गुप्ता यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी चौकशी सुरु
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेत रितसर कायदेशीर कारवाई करत अटक केली आणि त्याची चौकशी सुरू केली आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप उघड झालेले नाही.ही घटना मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील मोठी चूक मानली जात आहे. या हाणामारीदरम्यान रेखा गुप्ता यांनाही दुखापत झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षे अक्ष्यम चूक!
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेला हा हल्ला सुरक्षेतील मोठी चूक मानली जात आहे. या हल्ल्यात सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तींवरही कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आपल्या स्तरावर सकाळी साडे नऊपर्यंत कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.
भाजपकडून तीव्र निषेध
रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपच्या पक्षीय पातळीवरुन या घटनेची कठोर निंदा केली जात असून अनेक नेते आपला निषेध नोंदवत आहेत. या हल्ल्यानंतर भाजपचे दिल्लीचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवांनी घटनेचा निषेध केला आहे. हल्ल्याची बातमी पसरताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि त्याला "लोकशाही प्रक्रियेवर हल्ला" म्हटले.
माजी मुख्यमंत्री आतिशी यांचा रेखा गुप्ता यांच्या हल्ल्यावर तीव्र निषेध
माजी मुख्यमंत्री आप नेत्या आतिशी यांनी रेखा गुप्ता यांच्या हल्ल्यावर तीव्र निषेध नोंदवत प्रतिक्रीया दिली. त्या म्हणाल्या, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाहीमध्ये असहमती आणि निषेधाला स्थान आहे, परंतु हिंसाचाराला स्थान नाही. दिल्ली पोलिस दोषींवर कठोर कारवाई करतील अशी आशा आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित असतील अशी आशा आहे.












Click it and Unblock the Notifications