देवाने मला साथ दिली कारण मी प्रमाणिक होतो, तरुंगातून बाहेर येताच केजरीवाल यांचं जल्लोषात स्वागत
नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सायंकाळी 6.25 मिनिटांनी तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगातून बाहेर येताच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. तुरुंगातून बाहेर येताच आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल यांनी आप कार्यकर्त्यांना संबोधित केले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, "सर्वप्रथम मला त्या देवाचे आभार मानायचे आहेत, ज्यांच्यामुळे मी बाहेर पडलो. मंदिर, मशिदी, गुरुद्वारांमध्ये प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार. माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब देशासाठी आहे. समर्पित आहे."

जामीन मिळाल्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, "माझ्या आयुष्यात मी अनेक अडचणींचा सामना केला आहे. पण प्रत्येक पावलावर देवाने मला साथ दिली आहे. यावेळीही देवाने मला साथ दिली, कारण मी प्रामाणिक होतो, ठीक आहे... आज मला सांगायचे आहे की, मी तुरुंगातून बाहेर आलो आणि माझे धैर्य 100 पटीने वाढले...त्यांच्या तुरुंगाच्या भिंती केजरीवालांचे धैर्य कमकुवत करू शकत नाहीत...मी देवाला प्रार्थना करेन की मला योग्य मार्ग दाखवावा आणि मी त्या सर्वांविरुद्ध लढत राहीन. ज्या शक्ती देशाला कमकुवत करण्याचा आणि देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Firecrackers being burst by AAP workers outside the Tihar jail after Delhi CM Arvind Kejriwal was released from Tihar jail
— ANI (@ANI) September 13, 2024
The Supreme Court granted him bail in the Delhi excise policy case today pic.twitter.com/3iPBR93BiS
आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
मद्य दारू घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यावर आम आदमी पार्टीच्या मुख्यालयाबाहेर मोठा जल्लोष करण्यात आला. औपचारिकता पूर्ण केल्यानंतर केजरीवाल तिहार जेलच्या गेट क्रमांक 4 मधून बाहेर आले. याआधीही आपचे नेते आणि कार्यकर्ते जल्लोषात तल्लीन झालेले दिसले. पक्षप्रमुखांच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यासाठी मिठाई वाटण्यात येत आहे. काहींनी तर जल्लोषात फटाके फोडले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांसोबत मिठाई वाटली आणि 'आ गए भाई आ गए केजरीवाल आ गए' आणि 'जेल के ताले टूट गए केजरीवाल छूट गए' अशा घोषणा देऊन परिसर दणदणावून सोडला.












Click it and Unblock the Notifications