उद्या ठरणार दिल्लीत सत्ता कुणाची? निकाल कधी, कुठे.. 'या' ठिकाणी पहा निकालाची संपूर्ण अपडेट
दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला सर्वच्या सर्व 70 जागांसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता मतमोजणीची प्रतिक्षा आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी म्हणजेच उद्या 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दुपारी साधारणत: 12 वाजेपर्यंत सर्व निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 11 जिल्ह्यांत बनवण्यात आलेल्या 19 मतमोजणी केंद्रावर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.

मतमोजणीसाठी 19 केंद्र
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी एकूण 19 केंद्रांवर होणार आहे. उत्तर दिल्लीतील 8 विधानसभा मतदारसंघासाठी 2, ईशान्येकडील 5 विधानसभा मतदारसंघांसाठी 2 आणि नवी दिल्लीतील 6 विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी 3 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. शाहदरा आणि दक्षिण जिल्ह्यातील 5-5 विधानसभा मतदारसंघांसाठी एक-एक मतमोजणी केंद्र बनवण्यात आले आहेत.
एक्झिट पोलचा अंदाज काय?
5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध चॅनल्स आणि एजन्सीद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर करण्यात आली. जवळपास सर्वच एक्झिट पोलने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. आता मतमोजणीत नेमकं काय होतं हे पहावं लागेल. यावेळी मतदार अरविंद केजरीवाल यांना धक्का देतील का, या चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
निकाल कुठे आणि कसा पहायचा?
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरू होईल. सर्वप्रथम टपाल मतांची मोजणी करण्यात येईल. त्यानतंर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी होईल. निवडणुकीचे थेट निकाल निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट eci.gov.in आणि त्यासोबतच results.eci.gov.in वर पाहता येतील. तसेच वन इंडिया मराठीच्या https://marathi.oneindia.com या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला निकालाचे अपडेट्स पाहता येणार आहेत.
निकाल नेमका कसा पहावा?
सर्वप्रथम निवडणूक आयोगाच्या https://www.eci.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. यानंतर Assembly Election Result या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक करताच तुम्ही थेट निकालाच्या https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर पोहोचाल. या ठिकाणी तुम्हाला दिल्ली विधानसभा निवडणूक निकालचा एक बॉक्स दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला निकाल दिसतील.












Click it and Unblock the Notifications