Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी ड्राय डे जाहीर, जाणून घ्या कोणत्या दिवशी दारू विक्री बंद राहणार

Delhi Assembly Elections 2025: दिल्ली निवडणुकांच्या तयारीसाठी सरकारने दिल्ली उत्पादन शुल्क नियम 2010 अंतर्गत काही दिवस ड्राय डे म्हणून घोषित केले आहेत. या दिवसांत दिल्लीत दारू विक्री पूर्णपणे बंदी असेल. हा निर्णय मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणी म्हणजेच निकालाच्या दिवसाच्या पर्यंत असणार आहे. दारूच्या सेवनामुळे होणारा कोणताही अडथळा रोखताना निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी 5 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. या निवडणूकीच्या काळात काही ठराविक दिवशी ड्राय डे असल्याने शहरातील विविध व्यावसायिक जसे की दारूची दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लब बंद राहतील.

Dry Day

हे पाऊल एका व्यापक रणनीतीचा भाग आहे. जेणेकरून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पद्धतशीर पद्धतीने पार पडू शकेल. दारू विक्रीवर बंदी घालून शांततापूर्ण आणि नियंत्रित वातावरण निर्माण करता येईल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

दिल्लीतील राजकीय वातावरण

दिल्लीतील विधानसभा निवडणूकीत प्रचाराच्या आणि आरोप-प्रत्योरापाच्या मुद्द्याने चांगलेच तापलं आहे. या निवडणूकीत आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 'आम आदमी पक्षाने 2015 आणि 2020 मध्ये मोठ्या बहुमताने विजय मिळवल्यानंतर राजधानीत मजबूत प्रभाव पाडला आहे. दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस यावेळी त्यांची राजकीय पकड मजबूत करण्याच्या तयारीत व्यस्त आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणूक सत्ता मिळवण्यासाठी तिन्ही पक्षात तीव्र स्पर्धा दिसून येते. यावेळीही राजकीय पक्ष रोजगार, लोककल्याणकारी योजना आणि तरुणांसाठी मूलभूत सुविधांचे मुद्दे उपस्थित करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आम आदमी पक्षाने वाढत्या रोजगार संधी आणि लोककल्याणकारी योजनांना मुख्य निवडणूक मुद्दे बनवले आहे. भाजपने आरोग्यसेवा आणि नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले आहे. शिक्षण आणि पायाभूत सुविधा सुधारण्याला काँग्रेसने आपले प्राधान्य दिलं आहे.

सोशल मीडिया आणि आधुनिक निवडणुका

निवडणूक म्हटलं की सोशल मिडिया आधुनिक तंत्राचा वापर करुन प्रचार यंत्रणा राबवणे. तसेच निवडणूकीत सोशल मिडीयाच्या माध्यामातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष कंबर कसली आहे. या वेळी विधानसभा निवडणुकीत सोशल मीडिया आणि एआय-जनरेटेड कंटेंट सारख्या आधुनिक प्रचारात्मक साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मीम वॉर्स आणि डिजिटल प्रचारामुळे दिल्लीच्या निवडणूक रणनीतींना एक नवीन आयाम मिळाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+