Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

केजरीवालांची डोकेदुखी वाढणार, नवी दिल्ली मतदारसंघात 29 उमेदवार रिंगणात

Delhi Assembly election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 17 जानेवारी रोजी संपली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या मते दिल्लीतील 70 मतदारसंघांसाठी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 1,521 अर्ज दाखल झाले आहेत.

दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 981 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 17 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी एकूण 680 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

Arvind Kejriwal

फोटो सौजन्य- पीटीआय

आज शनिवार 18 जानेवारी रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे. दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

नवी दिल्ली मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नवी दिल्ली मतदारसंघासाठी एकूण 29 उमेदवारांनी 40 नामांकन अर्ज दाखल केले आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून दिल्लीच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांविरुद्ध निवडणूक लढत आहेत. यात भाजपाचे साहिब सिंग वर्मा यांचे चिरंजीव परवेश वर्मा आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित निवडणूक लढवत आहेत. या जागेवर तिरंगी लढत होणार आहे.

दिल्लीतील कोणत्या जागेवर सर्वात कमी उमेदवारी अर्ज ?

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार कस्तुरबा नगर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कस्तुरबा नगर विधानसभा जागेसाठी एकूण 6 उमेदवारांनी 9 नामांकन अर्ज दाखल केले आहेत. या जागेवरून आपने रमेश पहेलवान, भाजपने नीरज बसोया आणि काँग्रेसने अभिषेक दत्त यांना उमेदवारी दिली आहे.

दिल्लीत कोणत्या जागेवरून किती उमेदवारी अर्ज ?

कालकाजी विधानसभा मतदारसंघ: कालकाजी मतदारसंघातून एकूण 18 उमेदवारांनी 28 नामांकन अर्ज दाखल केले आहेत, जिथे विद्यमान मुख्यमंत्री आतिशी भाजपचे रमेश बिधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

पटपडगंज विधानसभा जागा: सत्ताधारी आपने पटपडगंज मतदारसंघातून प्रसिध्द प्राध्यापक अवध ओझा यांना उमेदवारी दिली आहे, जिथे 11 उमेदवारांकडून 20 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

जंगपुरा विधानसभा मतदारसंघ: जंगपुरा मतदारसंघात 12 उमेदवारांनी 19 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे आपचे उमेदवार आहेत. यापूर्वी निशा सिसोदिया 2013 पासून पटपरगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या.

- मध्य दिल्लीमध्ये 99 उमेदवारांनी एकूण 154 नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

- पूर्व दिल्लीमध्ये 79 उमेदवारांनी एकूण 119 नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

- नवी दिल्ली मतदारसंघात 85 उमेदवारांच्या वतीने एकूण 135 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ज्यात पटेल नगर, दिल्ली कॅन्ट, राजिंदर नगर, नवी दिल्ली, आरके पुरम आणि ग्रेटर कैलाश हे मतदारसंघ समाविष्ट आहेत.

- उत्तर दिल्लीत 108 उमेदवारांनी 183 अर्ज दाखल केले आहेत. तर ईशान्य दिल्लीत 80 उमेदवारांनी 116 अर्ज दाखल केले आहेत.

- निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार उत्तर-पश्चिम दिल्लीतून 90 उमेदवारांनी 139 अर्ज दाखल केले आहेत.

-शाहदरा मतदारसंघातून 78 उमेदवारांनी 124 अर्ज दाखल केले आहेत.

- दक्षिण दिल्लीमध्ये मालवीय नगर, मेहरौली, छत्तरपूर, देवली आणि आंबेडकर नगर मतदारसंघांचा समावेश असलेल्या 57 उमेदवारांनी एकूण 88 नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

- दक्षिण पूर्व दिल्लीतील 93 उमेदवारांकडून 140 नामांकने दाखल झाली आहेत.

- दक्षिण पश्चिम दिल्लीमध्ये 108 उमेदवारांनी 153 अर्ज दाखल केले आहेत.

- पश्चिम दिल्ली मतदार संघासाठी एकूण 170 नामांकन प्राप्त झाले आहेत, यात नांगलोई जाट, मोती नगर, मादीपूर, राजौरी गार्डन, हरी नगर, तिलक नगर आणि जनकपुरी भागांचा समावेश आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+