आप की भाजप? दिल्लीत कोणाचे सरकार स्थापन होणार ? काय आहे सर्व्हेचा अंदाज, घ्या जाणून
Delhi Assembly election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणूकीत सत्ता मिळवण्यासाठी आप आणि भाजप यांच्यात जोरदार स्पर्धा दिसून येत आहे. काँग्रेसही या शर्यतीत आहे, पण यावेळी दिल्लीत कॉंग्रेसची म्हणाव तशी काही दिसत नाही. दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर 8 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत यावेळी कोणाचे सरकार स्थापन होईल? याबाबत सर्वेक्षण सुरू झाले आहेत. अनेकांना वाटतं की 10 वर्षांच्या सत्ताविरोधी लाटेनंतर 'आप' पुन्हा सत्तेत राहील का? की काही महिन्यांपूर्वी शेजारच्या हरियाणामध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर भाजप पहिल्यांदाच दिल्ली निवडणूक जिंकेल? दिल्ली निवडणुकीबद्दल सी-व्होटरच्या सर्वेक्षणात काय म्हटलं आहे ते जाणून घेऊया.

सी-व्होटर सर्वेक्षणात काय समोर आले?
मीडिया रिपोर्ट्सनुसार सी-व्होटरने त्यांच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे की, ओपिनियन पोलसाठी संपर्क साधलेल्या 51% लोकांनी दिल्ली निवडणुकीत पुन्हा एकदा आप सरकार स्थापन होऊ शकते असे म्हटले आहे. त्याच वेळी 42 टक्के लोकांनी म्हटले आहे की यावेळी दिल्लीत सत्ता परिवर्तन होऊ शकते.
सरकार बदलू इच्छिणारे लोक काँग्रेसऐवजी भाजपच्या बाजूने मतदान करू शकतात, अस ही सर्वेक्षणात म्हटलं आहे . मतदारांच्या गोंधळामुळे यावेळी भाजपच्या मतांचा वाटा आणि जागांची संख्या लक्षणीय वाढू शकते. त्याच वेळी काही लोकांनी म्हटलं आहे की यावेळी दिल्लीत दोन्ही पक्षांमध्ये काटे की टक्कर होईल.
दिल्ली निवडणुकीबद्दल सट्टेबाजी बाजाराने काय म्हटलं आहे?
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे तर निकाल 8 फेब्रुवारी रोजी जाहीर होतील. दरम्यान, सट्टेबाजी बाजाराने दिल्लीच्या भावी सरकारबद्दलही भाकिते केली आहेत.
राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराच्या भाकीतानुसार आपला 39 ते 41 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 29 ते 31 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. 2024 मध्ये राजस्थानातील 9 लोकसभा जागांचे निकाल अचूकपणे वर्तवण्यात आल्यामुळे फलोदी सट्टा बाजार शेवटचा प्रकाशझोतात आला होता.












Click it and Unblock the Notifications