दिल्लीतील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, शेवटच्या दिवशी केजरीवाल व भाजपमध्ये जोरदार घमासान
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. दिल्लीत प्रमुख तिरंगी लढतीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी मैदानात आपली पूर्ण ताकद लावलेली दिसत आहेत. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. दुसरीकडे भाजपनेही केजरीवालांवर निशाणा साधत, आज तब्बल २२ रोड-शोचे नियोजन केलेय.

केजरीवालांचा मोठा आरोप
एका कार्यक्रमात बोलताना केजरीवाल म्हणाले की, 'दिल्लीत आम आदमी पार्टीच्या लोकांवर हल्ले होत आहेत. जनतेला धमकावले जात आहे. शेजारी उभे असलेले पोलिस सर्व काही पाहत आहेत. तो असहाय्य आहे. कोण आहे तो गुंड ज्याला पोलीस घाबरतात? काल दिल्लीत सात पत्रकारांवर हल्ला झाला. त्यांची डोकी फोडली गेली. त्यांना पोलिसांनी अटकही केली. संसदेपासून एक किलोमीटर अंतरावर, निवडणूक आयोगापासून एक किलोमीटर अंतरावर हा सर्व प्रकार घडला.
केजरीवालांची गुंडगिरीवर टिका
केजरीवाल म्हणाले, 'या निवडणुकीदरम्यान महिलांवर हल्ले होत आहेत. महिला कर्मचाऱ्यांनाही सोडले जात नाही. वाहनांवर हल्ले करण्यात आले. आता त्यांच्या गुंडगिरीचा पराभव करायचाच आहे, असा निर्धार जनतेने केला आहे. हा दुहेरी बुलडोझर सर्वांना चिरडून टाकेल. आमच्यासमोर दोन पर्याय आहेत, एक शरीफ पक्ष आणि दुसरा गुंडा पक्ष. जनता ही गुंडगिरी सहन करणार नाही.
आपचे निवडणूक आयोगावर ताशेरे
निवडणूक आयोगावर हल्लाबोल करताना आपचे केजरीवाल म्हणाले की, 'निवडणूक निष्पक्ष व्हावी यासाठी लोकांनी त्याग केला होता. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना असे कोणते पद देऊ केले आहे, ज्याच्या बदल्यात तुम्ही लोकशाही नष्ट करू शकता, मी राजीव कुमार यांना विनंती करतो की, पदाचा लोभ सोडा, तुमचे पद इतके गहाण ठेवू नका.
भाजपचाही जोरदार पलटवार
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपनेही आपला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. केजरीवालांवर निशाणा साधण्याची एकही संधी भाजपच्या नेत्यांनी सोडली नाही. आज दिल्लीत तब्बल २२ रोड-शोचे आयोजन करण्यात आले आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिल्लीत भाजपचे अनेक बड्या नेत्यांच्या सभा, रॅल्या आयोजित करण्यात आल्या आहे. केजरीवालांच्या भ्रष्ट्राचारावर जोरदार प्रहार करण्याचे काम आज शेवटच्या दिवशीही करण्याचे नियोजन असल्याचे समजते.












Click it and Unblock the Notifications