Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Breaking..दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार! निवडणूक आयोगाची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेची मुदत फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. त्या पार्श्वभुमीवर आज दिल्लीत निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे. निवडणूक आयोगाची आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार आहेत. दरम्यान तारीख घोषित होताच आज दुपारपासूनच दिल्लीत आचारसंहिता लागू होणार आहे.

Delhi Assembly Election 2025

निवडणूक आयोग उमेदवाराच्या नामांकनाची तारीख, नामांकन मागे घेण्याची तारीख, मतदानाची तारीख आणि निकाल पत्रकार परिषदेत कळणार आहे. दिल्लीत प्रामुख्याने तीन मोठे पक्ष निवडणूक लढवत आहेत. भारतीय जनता पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस आपले नशीब आजमवणार आहे. आप 70 तर काँग्रेस 48 जागा लढवत आहे तर भाजपने आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत.

दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे. गेल्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2020 मध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये आम आदमी पक्षाने पूर्ण बहुमत आणि 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर अतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते.

AAP ने सर्व 70 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत

आम आदमी पार्टी (AAP) ने 15 डिसेंबर रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांची घोषणा केली होती. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. कालकाजीमधून सीएम आतिशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलासमधून तर सत्येंद्र जैन हे शकूर बस्तीमधून निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसच्या तीन याद्या जाहीर, 48 उमेदवार जाहीर

काँग्रेस महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा कालकाजी मतदारसंघातून दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी शुक्रवारी त्यांच्या नावाची घोषणा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 3 यादीत 48 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+