Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिल्ली विधानसभेत आप की भाजप ? 8 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार

Delhi Assembly Election 2025 : दिल्लीतील विधानसभेतील 70 जागांसाठी बुधवार 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाली आणि सायंकाळी 6 वाजता संपले. 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.

नवीन वर्ष 2025 मधील ही पहिली मोठी निवडणूक मानली जात आहे. नवीन वर्षात दिल्लीला नवीन सरकार आणि मुख्यमंत्री मिळेल. दिल्ली हे राज्य नसून एक केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्लीला राष्ट्रीय राजधानी प्रदेश (एनसीटी) दिल्ली म्हणून ओळखले जाते.

delhi Assembly election 2025 resul

दिल्ली विधानसभा निवडणूक ही अत्यंत अटीतटीची मानले जाते. या निवडणूकीत आप, भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात तिरंगी लढत आहे. आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. 'आप' सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळी, भाजप बऱ्याच काळानंतर सत्तेत परतण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस आपली गमावलेली विश्वासार्हता परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

मागील दोन निवडणुकांमध्ये 2015 आणि 2020 'आप'ने मोठे विजय मिळवला होता. यापूर्वी, शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना काँग्रेस 15 वर्षे (1998-2013) सत्तेत होती. दिल्लीत भाजप सत्तेबाहेर राहून 27 वर्षे झाली आहेत.

एक्झिट पोलमध्ये कोण पुढे आहे?

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये आप आणि भाजपमध्ये जोरदार स्पर्धा आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत 62 जागा जिंकणारा आम आदमी पक्ष यावेळी बहुमत मिळविण्यात अपयशी ठरताना दिसत आहे.

निकाल कधी येतील?

दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी 5 फ्रेबुवारीला मतदान पार पडल्यानंतर काल सायंकाळी एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.या एक्झिटपोलमध्ये भाजप दिल्लीत सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सरुवात होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+