दिल्ली निवडणुकीसाठी भाजपने चौथी यादी जाहीर , शिखा राय यांना ग्रेटर कैलाशमधून तिकीट
Delhi Election 2025 ( BJP Candidate List): दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने गुरुवारी 16 जानेवारी रोजी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत भाजपने 9 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आतापर्यंत भाजपाने एकूण 68 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
या यादीत भाजपने ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघातून शिखा राय यांना तिकीट दिले आहे. आपकडून सौरभ भारद्वाज यांना तिकिट मिळण्याची शक्यता आहे. वजीरपूर मतदारसंघातून पूनम शर्मा यांना तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वी ग्रेटर कैलाशमधून माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना तिकीट देण्याची चर्चा होती. यावर प्रतिक्रिया देताना सौरभ भारद्वाज म्हणाले होते की, जर इराणी यांनी दिल्ली निवडणूक लढवली तर लढत रंजक होईल.

भाजपने दिल्ली कॅन्टमधून भुवन तंवर, संगम विहारमधून चंदन कुमार चौधरी, त्रिलोकपुरीमधून रविकांत उज्जैन, शाहदरामधून संजय गोयल, बाबरपूरमधून अनिल वशिष्ठ आणि गोकलपूर येथून प्रवीण निमेश यांना उमेदवारी दिली आहे. रवींद्र कुमार यांना बवाना येथून तिकीट देण्यात आलं आहे.
भाजप उमेदवारांच्या चौथ्या यादीतील 9 नावे
1. बवाना (अनुसूचित जाती): रवींद्र कुमार (इंद्रराज)
2. वजीरपूर: पूनम शर्मा
3. दिल्ली कॅन्ट: भुवन तंवर
4. संगम विहार: चंदन कुमार चौधरी
5. ग्रेटर कैलास: शिखा राय
6. त्रिलोकपुरी (अजा) : रवीकांत उज्जैन
7. शाहदरा : संजय गोयल
8. बाबरपूर: अनिल वशिष्ठ
9. गोकलपूर (अजा) : प्रवीण निमेश
#DelhiElections2025 | BJP releases the fourth list of 9 candidates for the upcoming elections. pic.twitter.com/JQgoDtPRUf
— ANI (@ANI) January 16, 2025
भाजपने आतापर्यंत एकूण 68 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. आता 2 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा बाकी आहे. जनता दल-(युनायटेड) (जेडीयू) आणि लोजपा यांच्याशी युती करून भाजपने या दोन्ही जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून जेडीयू दोन विधानसभा जागा लढवू शकते.












Click it and Unblock the Notifications