Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महिलांना 2500,गर्भवती महिलांना 21,000,मोफत सिलेंडर, भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठे मुद्दे

BJP Manifesto 2025: दिल्ली विधानसभा निवडणूकीत आता चांगलीच रंगत वाढली आहे. सर्वांच पक्षाकडून आपल्या उमेदवारी यादी आणि जाहीर प्रसिध्द करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा म्हणजेच संकल्प पत्र प्रसिद्ध केले आहे.

संकल्प पत्राचे प्रकाशन करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, वचन पूर्ण करण्यात आमचा स्ट्राइक रेट 99.9 टक्के आहे. जेपी नड्डा म्हणाले हा भाजपच्या जाहीरनाम्याचा पहिला भाग आहे. दुसरा आणि तिसरा भागही लवकरच प्रदर्शित होईल.

bjp release manifesto

भाजपने दिल्लीतील महिलांना दरमहा 2500 रुपये आणि गर्भवती महिलांना 21,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच होळी आणि दिवाळीला सिलिंडर मोफत दिले जातील.एलपीजी सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी दिली जाईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे.

जेपी नड्डा म्हणाले की, जर दिल्लीत भाजपचे सरकार आले तर सध्याच्या कल्याणकारी योजना सुरूच राहतीलच, शिवाय त्या अधिक प्रभावी आणि भ्रष्टाचारमुक्तही केल्या जातील. तसेच दिल्लीतील महिला समृद्धी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा 2500 रुपये दिले जातील. ही योजना पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केली जाईल, असं जे. पी नड्डा यांनी सांगितले आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे

1. दिल्लीतील सर्व कल्याणकारी योजना सुरू राहतील. म्हणजे दिल्लीत जी काही योजना आधीच चालू आहे...ती तशीच चालू राहील.

2. महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जातील, या योजनेचे नाव महिला समृद्धी असेल.

3. महिलांना सिलेंडरवर 500 रुपयांचे अनुदान दिले जाईल.

4. होळी आणि दिवाळीला एक सिलिंडर मोफत दिला जाईल.

5. प्रत्येक गर्भवती महिलेला 21,000 रुपये दिले जातील.

6. मातृ सुरक्षा वंदनाला अधिक ताकद देण्यासाठी 6 पोषण किट दिले जातील.

7. दिल्लीमध्ये, ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजेच 60-70 वयोगटातील पेन्शनमध्ये 2000 रुपयांनी वाढ करून 2500 रुपये केले जातील.

8. ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 3,000 रुपये पेन्शन दिले जाईल.

9. विधवा आणि अपंगांना दरमहा 3 हजार रुपये दिले जातील.

10. दिल्लीतील झोपडपट्ट्यांसाठी अटल कॅन्टीन योजना सुरू केली जाईल, ज्याअंतर्गत 5 रुपयांत जेवण मिळेल.

भाजपचे वचन - दिल्लीकरांना 10 लाख रुपयांचे आरोग्य कवच

जेपी नड्डा म्हणाले, "आम्ही निर्णय घेतला आहे की, दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात आम्ही दिल्लीत आयुष्मान भारत योजना पूर्णपणे लागू करू आणि यासोबतच दिल्ली सरकारकडून 5 लाख रुपयांची अतिरिक्त मदत देऊ." म्हणजेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत दिल्लीतील रहिवाशांना एकूण 10 लाख रुपयांचे आरोग्य कव्हर मिळेल.

प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे

"मातृत्व रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली आहे... जर भाजप सत्तेत आला तर दिल्लीतील महिलांना 'महिला समृद्धी योजने' अंतर्गत 2,500 रुपये मासिक मदत दिली जाईल, असा निर्णय आम्ही घेतला", असल्याचं नड्डा यांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+