आतिशी सरकारचं मोठ्ठ गिफ्ट!अकुशल कामगारांना 18,066, अर्ध-कुशल कामगारांना 19,929 रुपये किमान वेतन!

Delhi Aam Aadmi Atishi government hikes minimum wages : दिल्लीत मुख्यमंत्रीपदी आतिशी मार्लोना या विराजमान झाल्यानंतर त्यांच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने दिवाळीपूर्वी कामगारांना मोठी भेट दिली आहे. सरकारने कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. अकुशल कामगारांना 18,066, असंघटीत क्षेत्रातील अर्ध-कुशल कामगारांना 19,929 रुपये किमान वेतन जाहीर करण्यात आले आहे.

नेमके काय म्हणाल्या आतिशी?

मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, 2013 मध्ये अकुशल कामगारांचे किमान वेतन 7 हजार 722 रुपये होते. आता ती वाढवून 18 हजार 66 करण्यात आली आहे. यासह अर्धकुशल कामगारांचे किमान वेतन 19 हजार 929 रुपये आणि कुशल कामगारांचे किमान वेतन 21 हजार 917 रुपये करण्यात आले आहे.

Delhi Aam Aadmi Atishi government hikes minimum wages

आपचे उत्कृष्ट काम - आतिशी

आतिशी म्हणाल्या की, 10 वर्षांपासून आप सरकारने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील लोकांना सुविधा देण्यासाठी काम केले आहे. केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने शिक्षण-आरोग्य, वीज-पाणी ते किमान वेतनापर्यंत सर्वच बाबतीत उत्कृष्ट काम केले आहे.

भाजपवर निशाणा

भाजपवर निशाणा साधत मुख्यमंत्री म्हणाल्या, 2016-17 मध्ये केजरीवाल यांनी किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा भाजप नेहमीच गरीबांच्या विरोधी राहीली आहे. भाजपने आपल्या LG मार्फत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पण केजरीवाल यांनी न्यायालयाचा आदेश आणून त्याची अंमलबजावणी करून घेतली आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वर्षातून दोनदा दिला जातो, त्याचप्रमाणे किमान वेतनातही दोनदा वाढ करावी, अशी तरतूद केली.

महिलांना मिळणार हे मोठं गिफ्ट

कामगारांना दिलेल्या गिफ्टसोबतच दिल्ली सरकार महिलांनाही मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. आप सरकार हरियाणा निवडणुकीनंतर महिलांना एक हजार रुपये देण्याची महत्त्वाकांक्षी योजना लागू करू शकते, मंगळवारी दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची कागदपत्रे जवळपास पूर्ण झाली आहेत. आतिशी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते मांडण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+