Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Zomato चे CEO दीपिंदर गोयल यांनी आपल्या प्रेयसीपासून लपवला होता स्वतःचा व्यवसाय, कारण काय? तर वाचा

झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल सध्या चांगलेच चर्चेत आहे. कधी आपल्या संपत्तीने तर कधी आपल्या कंपनीबाबत पसरत असलेल्या अफवांबाबत ते कायम चर्चेत राहतात. वयाच्या तिशीत त्यांनी कमवलेली संपत्ती व मिळवलेले नाव खरोखर अद्भूत आहे. या चर्चा होत असतानाच त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या, अर्थात मेक्सिकन माँडेल ग्रासियाच्याही चर्चा होतात. कोण आहे दिपिंदर सिं यांची दुसरी पत्नी? कशी फुलली त्यांची प्रेमकहाणी? याच प्रश्नांची उत्तरे आपण शोधूयात...

Zomato founder s love story

कशी झाली भेट?

एका मुलाखतीत दिपिंदरने आपल्या दुसऱ्या प्रेमाविषयीचा खुलासा केला हातो. दिपींदर व मॅक्सिकन माँढेल ग्रासिया यांची लव्हस्टोरी इतरांप्रमाणेच अचानक सुरु झाली. ग्रासिया ही दिपिंदरच्या मित्राची मैत्रिण होती. ती दिल्लीत एका कामानिमित्त आली होती. त्याच मित्राने दीपिंदरसोबत ग्रासियाची ओळख करुन दिली. त्यापूर्वी दीपिंदरच्या मित्रांनी त्याच्याकडे लग्न करण्याचा हट्ट धरला होता. परंतु जेव्हा चांगली मुलगी भेटेल तेव्हा लग्नाचा विचार करील, असं दीपिंगर त्याच्या मित्रांना सांगत होता.

कसं जुळलं प्रेम?

दीपिंदर व ग्रासिया जेव्हा दिल्लीत पहिल्यांदा भेटले तेव्हा हे दोघेही एकमेकांबाबत चांगलेच प्रभावित झाले. पहिल्या भेटीतच त्यांची केमिस्ट्री जमली. ग्रासियाला योग शिकविण्यास मदत करील, असा शब्द दीपिंदरने दिला. ग्रासिया एक चांगली योगापटू होती. त्यामुळे दीपिंगरने दुसऱ्याच दिवशी तिला भेटण्याचा पुन्हा प्लॅन केला. आता याच भेटीत तिला लग्नाचे बोलून दाखवायचे, असं दीपिंगरने ठरवलं होतं. त्यानुसार त्यांची ही दुसरी भेट तब्बल तीन तास चालली, असंही दीपिंदरने मुलाखतीत सांगितलं होतं.

झोमॅटोची गोष्ट लपवली

त्यानंगर दीपिंदर आणि ग्रासिया यांच्यात भेटीगाठी होत होत्या. मात्र या भेटीत तब्बल चार महिने दीपिंगरने आपण झोमॅटोचे संस्थापक आहोत, हे ग्रासियापासून लपवले होते. अगोदर मने जुळावीत व दोघांचे संभाषण हे आपल्या कामाव्यतिरिक्त व्हावे, असं दीपिंगरला वाटत होतं. त्यामुळे तब्बल चार महिने त्याने आपल्या प्रेयसिपासून आपलं काम लपवलं, असंही त्यानं सांगितलं.

कधी झाला विवाह?

भेटीगाठीत मने जुळल्यानंतर मित्रांच्या आग्रहाखातर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अखेर २२ मार्च २०२४ रोजी दीपिंगर आणि ग्रासिया यांनी विवाह केला. झोमॅटोची मालकीन असली तरी, ग्रासियाला छोले भटुरे खूप आवडतात असेही तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+