सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दिवाळीपूर्वी वाढणार? 'एवढ्या' वाढीची प्रतीक्षा
केंद्र सरकार दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाचं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. एका मिडियाच्या म्हणण्यांनुसार 25 ऑक्टोंबरपर्यंत महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची घशघशीत वाढ करण्याचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाले तर देशातील सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी व पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.
मिळणार तीन महिन्यांची थकबाकी
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार 25 ऑक्टोबरपर्यंत महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारची संपूर्ण योजना तयार असल्याचेही सांगण्यात येत आहे. केंद्रीय कर्मचारीही त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत आहे. लवकरच याची घोषणा केली जाऊ शकते. सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवल्यानंतर तो 50 टक्क्यांवरून 53 टक्के होईल. यावर लवकरच मंत्रिमंडळ मंजुरीची शिक्कामोर्तब करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयानंतर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकी मिळणार आहे.

हिमाचल सरकारने महागाई भत्ता वाढवला
केंद्र सरकारने 2023 मध्ये दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती. नुकतीच हिमाचल प्रदेश सरकारने दसऱ्यापूर्वी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर केली. याचा फायदा राज्यातील 1.80 लाख कर्मचारी आणि 1.70 लाख पेन्शनधारकांना झाला. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या आधारे महागाई भत्ता ठरवला जातो. वर्षातून दोनदा वर्तमान महागाईचा अंदाज घेऊन ही वाढ ठरवली जाते.












Click it and Unblock the Notifications