Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताचा डी. गुकेश ठरला सर्वात तरुण विश्वविजेता; बुद्धीबळाच्या पटाचा 'असा' ठरला अनभिषिज्ञ सम्राट

D. Gukesh becomes youngest world champion: भारताच्या क्रिडा विश्वाच्या इतिहासात एक नवा आध्याय आज जोडला गेला. बुद्धीबळपटू डी गुकेश यांनी वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. अटीतटीच्या सामन्यात त्याने जगज्ज्येत्या डिंग लिरेनचा पराभव केला. या बातमीनंतर भारतात एकच जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे डी गुकेश हा आत्तापर्यंतच्या बुद्धीबळाच्या इतिहासात सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे.

D  Gukesh

असा रंगला थरारक सामना

सिंगापूर येथे आज जागतिक बुद्धीबळ स्पर्धेचा शेवटचा सामना खेळला गेला. भारताचा डी गुकेश आणि चायनिज ग्रॅण्डमास्टर डिंग लिरेन यांच्यात हा सामना झाला. या दोघांत तब्बल १४ डाव खेळले गेले. या सामन्यात पहिला डाव लिरेनने जिंकला होता. त्यानंतर दुसरा डाव अनिर्णित राहिला. त्यानंतर तिसरा डाव गुकेशने जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही ग्रॅण्डमास्टर्सने सलग सात डाव बरोबरीत सोडले. अकरावा डाव गुकेशने जिंकला. त्यानंतर बारावा डाव लिनेनने जिंकला. आता सामना शेवटच्या म्हणजेच १४ व्या डावापर्यंत आला होता. सर्वांची उत्कंठा वाढली होती. हा मुकाबला टायब्रेकरवर जाईल का, याबाबतही चर्चा सुरु झाली होती. मात्र गुकेशने दमदार खेळ करत चौदावा डाव जिंकला

डी गुकेश ठरला विश्वविजेता

चौदाव्या डावात विजय मिळवत डी गुकेश विश्वविजेता ठरला. सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता होण्याचा विक्रम आता गुकेशच्या नावावर नोंदला गेला आहे. लिरेनच्या हातून झालेल्या घोडचुकीनंतर गुकेश विश्वविजेता होणार असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याच्या डोळ्यात विजयाश्रू तरळले. १८वर्षीय गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवला.

गुकेशने वाढवली शान

गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर विश्वविजेता ठरणार दुसरा भारतीय ठरला आहे. गुकेश आणि डिंग यांनी गुरुवारी सामन्याच्या अंतिम डावात प्रत्येकी ६.५ गुणांसह बरोबरी साधली. १४व्या डावात, ज्यात डिंग पांढऱ्या सोंगट्यासह खेळत होता, तो सामन्याच्या ५३व्या चालीत डिंगने चूक होईपर्यंत अनिर्णित दिशेने वाटचाल केली होती. गुकेशने खेळत राहत डिंगवर दबाव आणणं सुरू ठेवलं आणि यात गतवर्षीचा विश्वविजेता लिरेन फसला. हा सामना गुकेशने जिंकला व भारताचे नाव पुन्हा या खेळात अग्रक्रमावर आणलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+