कानपूरमध्ये रेल्वे रुळावर सिलेंडर, इर्मजन्सी ब्रेक लावत रेल्वे रोखली, 57 दिवसांतील 22वी घटना
Kanpur Train Accident : कानपूरमधील प्रेमपूर स्टेशनजवळ जेटीटीएन मालगाडी रुळावरून उतरवण्याचा रचल्याचे उघडकीस आले आहे. रविवारी सकाळी 6 च्या सुमारास लूप लाइनवरील लोको पायलटने सिलिंडर पाहताच आपत्कालीन ब्रेक लावला आणि सिलिंडरच्या 10 फूट आधीच ट्रेन थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, देशभरातील गेल्या साठ दिवसातील ही 22 वी घटना घडली आहे.
यापूर्वी 20 सप्टेंबर रोजी सुरतमध्ये रेल्वे रुळांवर छेडछाड करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. दुसरीकडे, शनिवारी रात्री बिहारमधील मुझफ्फरपूर जंक्शनवर मुझफ्फरपूर-पुणे विशेष रेल्वेचे इंजिन रुळावरून घसरले. सिग्नल न मिळाल्याने गाडी पुढे जाऊ लागल्याने हा अपघात झाला.

केंद्राकडून कायद्यात बदल केला जाणार
गाड्या रुळावरून घसरण्याचे वाढते प्रयत्न पाहता केंद्र सरकार रेल्वे कायद्यात सुधारणा करणार आहे. याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाऊ शकते. या अंतर्गत अपघात घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जन्मठेपेपासून फाशीपर्यंतच्या शिक्षेचीही तरतूद असेल.
14 दिवसांत कानपूरमध्ये दुसरी घटना
कानपूरच्या प्रेमपूर स्थानकात सिलिंडर ठेवल्याची माहिती मिळताच वरिष्ठ रेल्वे अधिकारी, आरपीएफ, जीआरपी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की मालगाडी कानपूरहून प्रयागराजकडे जात होती. ट्रॅकवर ठेवलेला 5 किलोचा सिलेंडर रिकामा होता. यूपीमध्ये 38 दिवसांत ट्रेन उलटवण्याचा हा पाचवा कट आहे. यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी कानपूरमध्येच भरलेले सिलिंडर ठेवून कालिंदी एक्स्प्रेस रुळावरून उतरवण्याचा कट रचण्यात आला होता.

संवेदनशील स्पॉट व रेल्वे इंजिनवर कॅमेरे लावले जाणार
रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रॅकवर बॅरिकेड्स लावण्याच्या कटाचा प्रतिकार करण्यासाठी, निवडक प्रवासी गाड्यांना संवेदनशील भागातून जाण्याची परवानगी देण्यापूर्वी पायलट लोको चालवल्या जातात. यासोबतच रेल्वे ट्रॅकवर पोलिस आणि गँगमनची तपासणी वाढवण्यात आली आहे.
रेल्वे येत्या काही दिवसांत संवेदनशील ठिकाणी कॅमेरे बसवण्याच्या तयारीत आहे. रेल्वे इंजिनांवरही कॅमेरे बसवण्याची योजना आहे, जेणेकरून प्रत्यक्ष वेळेवर देखरेख करता येईल. अशा परिस्थितीत ट्रॅकवर अडथळा निर्माण झाल्यास चालकांना आगाऊ गाडी थांबवता येणार आहे.












Click it and Unblock the Notifications