Cyclone Fengal: चक्रीवादळाने किनारी भागात कहर, रस्त्यांवर पाणी, हॉस्पिटलमध्ये घुसले, भूस्खलनाची भीती

बंगालच्या उपसागरातून उगम पावलेल्या फंगल वादळाने संध्याकाळी 7.30 वाजता पुद्दुचेरीतील कराईकल आणि तामिळनाडूमधील महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकण्यास सुरुवात केली आहे. वादळ येथून पुढे जाण्यासाठी सुमारे 3 तास लागतील.

लँडफॉल दरम्यान, ताशी 90 किमी वेगाने वारे वाहतील. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही वादळाचा प्रभाव दिसून येत आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. एटीएमजवळ शॉर्टसर्किट होऊन विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला.

Cyclone Fengal

पुद्दुचेरीच्या अनेक भागात पावसाचा अलर्ट

लँडफॉल दरम्यान, ताशी 90 किमी वेगाने वारे वाहतील. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही वादळाचा प्रभाव दिसून येत आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. एटीएमजवळ शॉर्टसर्किट होऊन विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाल्याची माहिती मिळणार आहे.

विमान उड्डानांवरही परिणाम

फेंगल चक्रीवादळाचा या भागातील अनेक शहरातील विमातळावरील उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. अनेक गाड्याही नियोजित वेळेपासून उशिराने धावत आहेत.

या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील कांचीपुरम, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, कुड्डालोर, विल्लुपुरम, कल्लाकुरिची, चेन्नई आणि मायिलादुथुराई जिल्ह्यात आज शाळा आणि महाविद्यालये बंद राहिली.

या जिल्ह्यांतील लोकांनाही घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 7 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये 30 सैनिक ठेवण्यात आले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+