Crime news : महिलेचा नग्न मृतदेह सापडला..! शीरच गायब! मृत्यूचे गुढ उकलण्याचा पोलिसांचा प्रयत्न..
crime news : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील गुजैनी येथे काल पहाटे एका महिलेचं नग्न मृतदेह सापडला. गंभीर म्हणजे या मृतदेहाचे शीरच गायब आहे. त्यामुळे नेमका कुणाचा खून झाला हे स्पष्ट करताना पोलिसांसमोर अडचणी आल्या होत्या. पण महिलेची ओळख आता पटली असून या महिलेवर अत्याचार झाला असावा अशी शक्यताही पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
महिलेचा केवळ नग्न धड असलेला मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर आढळून आला असून एक उलटूनही पोलिसांना अद्याप यश आलेले नसून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी
दरम्यान या घटनेनंतर महिलेवर बलात्कार केला असावा त्यानंतर तिचा खून करण्यात आला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून महिलेची ओळख पटवली आहे.
महामार्गापलीकडे असलेल्या हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये याच देहयष्ठीची महिला महामार्गावरुन जाताना दिसली होती. त्यानंतर मृतदेहच समोर आला आहे. हे सर्व फुटेजमध्ये दिसत आहे.
दरम्यान मृत महिलेने राखाडी रंगाची पँट घातलेली दिसत आहे आणि मृतदेहाजवळ राखाडी कपडे फाटलेल्या अवस्थेत सापडले आहेत.
काल सकाळी सव्वा सहा वाजता प्रथमतः मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, परंतु 3 किमी दूर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने एका महिलेचे एकटे फिरतानाचे दृश्य टिपले आहे.
सीसीटीव्हीत दिसणारी महिला आणि तिचे कपडे आणि चप्पल मृत महिलेच्या कपड्यांशी आणि चपलेशी जुळत असल्याचे समोर आले आहे असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आणखी काही धागेदोरे पोलिसांना मिळण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
का झाला खून...?
महामार्गावर सापडलेल्या मृतदेहासंबंधित पुरावे पोलिसांच्या हाती अद्याप आले नाहीत विशेष म्हणजे मृत महिला बेपत्ता होती काय हेही पोलिसांना अजून स्पष्ट करता आलेले नाही. कारण त्यासंबंधित त्यांच्याकडे तक्रारही आलेली नाही. पोलिस आता सीसीटीव्ही फुटेज पाहून महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
उप्र में महिला अपराध की एक और दिल दहला देनेवाली घटना में कानपुर के हाईवे पर एक महिला की सिर कटी, निर्वस्त्र लाश का मिलना है। मृतका के साथ हुई बेरहम हिंसा और असीम शारीरिक पीड़ा दिये जाने के जो सबूत मिले हैं, नैतिकता कहती है उनका उल्लेख न किया जाए। मृतका के साथ हर संभव प्रताड़ना व…
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 11, 2024
अखिलेश यादव यांच्याकडून दखल
मृत महिला सापडल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी या घटनेची दखल घेतली असून त्यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
"महिलांविरुद्धच्या गुन्ह्याच्या आणखी एका धक्कादायक प्रकरणात, कानपूरमध्ये एका महिलेचा शिर नसलेला, विवस्त्र मृतदेह आढळून आला. या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून अशी शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून गुन्हेगार घाबरून जातील आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही."
अशी त्यांची मागणी आहे. यादव यांनी आशा व्यक्त केली की, भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार राजकारणाच्या पलिकडे जाऊन या घटनेची चौकशी करेल.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग









Click it and Unblock the Notifications