Corona Case Update : सावधान! देशात कोविड केसेस 5,000 च्या पुढे, राज्यनिहाय परिस्थिती जाणून घ्या
Covid 19 Case Update in Marathi News : देशभरात कोविड-19 केसेस सतत वाढत आहेत आणि सक्रिय रुग्णांची संख्या 5000 च्या पुढे गेली आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारने राज्य सरकारांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
याशिवाय, राज्यांनी नागरिकांसाठी अलर्ट देखील जारी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सक्रिय रुग्णांची संख्या 5,364 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 4 मृत्यू देखील नोंदवले गेले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केला अलर्ट
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. लोकांना घाबरण्याची गरज नाही. कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगाल, केरळसारख्या राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, कोविडची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कोरोनाची राज्यवार स्थिती घ्या जाणून?
दिल्लीतील स्थिती काय
शुक्रवारी दिल्लीत कोविडचे 30 नवीन रुग्ण आढळले आणि आता राजधानीत सक्रिय रुग्णांची संख्या ५९२ वर पोहोचली आहे. गुरुवारनंतर दिल्लीत कोरोनामुळे एकही नवीन मृत्यू झालेला नाही.
महाराष्ट्रातील स्थिती काय
शुक्रवारी महाराष्ट्रात ११४ नवीन कोविड रुग्ण आढळले. जानेवारीपासून राज्यात १,२७६ रुग्ण आढळले आहेत आणि आतापर्यंत १८ मृत्यू झाले आहेत.
हरियाणा राज्यात किती आहे रुग्ण?
हरियाणामध्ये कोरोनाचे ३१ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २० जण गुरुग्राम आणि फरीदाबादमधील आहेत. याशिवाय, कर्नाल आणि झज्जरमधून ३-३, पानिपतमधून २, यमुनानगर, हिसार आणि पंचकुलामधून १-१ रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या ८७ सक्रिय रुग्ण आहेत आणि रुग्णालयात फक्त २ रुग्ण दाखल आहेत.
तामिळनाडू राज्यात किती आहे रुग्ण?
शुक्रवारी २७ नवीन कोविड रुग्ण आढळल्यानंतर, तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे, गर्भवती महिला, मुले आणि वृद्धांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात कोविडच्या एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या १९४ आहे.
केरळ राज्यात किती आहे रुग्ण?
सध्या केरळमध्ये सर्वाधिक कोविड रुग्ण आहेत. राज्यात एकूण १८०६ रुग्ण आहेत, त्यापैकी शुक्रवारी २३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. बकरी ईदचा सण आणि गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने लोकांना सामाजिक अंतर पाळण्याचे, सॅनिटायझर वापरण्याचे आणि मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.












Click it and Unblock the Notifications