Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Corona : भारतात पुन्हा कोरोनाचे थैमान?, या अभिनेत्रीला लागण, 'या' देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ

Corona 19, India, Shilpa Shirodkar : कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. हाँगकाँगमध्ये, गेल्या 10 आठवड्यात दर आठवड्याला कोविडच्या घटनांमध्ये तीस टक्क्यांपेक्षा जास्त पटीने वाढ झाली आहे. पण ही वाढ केवळ हाँगकाँगपुरती मर्यादित नाही. सिंगापूरमध्येही एका आठवड्यात रुग्णसंख्येत सुमारे तीस टक्क्यांनी झाली.

चीन आणि थायलंडमधूनही कोविडच्या वाढत्या रुग्णांच्या बातम्या येत आहेत. दुसरीकडे भारतातील काही राज्यांमध्ये देखील पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना थैमान घालणार का, अशी चिंता आता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे.

शिल्पा शिरोडकर या अभिनेत्रीला कोरोनाची लागण

दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला कोरोना झाल्याने तो आयपीएल 2025 मधून बाहेर पडल्याच्या बातम्या समोर आल्या. तोच दिग्गज अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.

Corona outbreak in India again

हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांत वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, 10 मे 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात हाँगकाँगमध्ये एकूण 1,042 कोविड प्रकरणे नोंदवली गेली. मागील आठवड्यात हा आकडा 972 होता. मार्चच्या सुरुवातीला, दर आठवड्याला फक्त 33 प्रकरणे होती. म्हणजेच मार्चपासून कोवीड रुग्णांची वाढ होत आहे.

पॉझिटिव्ह रेटमध्ये होतेय सातत्याने वाढ

सर्वात मोठी चिंता म्हणजे येथे कोविड पॉझिटिव्ह रेट सातत्याने वाढत आहे. 1 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात, पॉझिटिव्हिटी दर फक्त 0.31% होता. 5 एप्रिलपर्यंत ते 5.09% पर्यंत वाढले आणि 10 मे रोजी संपलेल्या आठवड्यात ते 13.66% पर्यंत वाढले.

हाँगकाँग सरकारने लोकांना स्पष्टपणे सांगितले आहे की, प्रत्येकाने स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वैयक्तिक आणि आजूबाजूच्या स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून आपण स्वतःचे आणि इतरांचे कोविडपासून संरक्षण करू शकू.

बूस्टर डोस घेतला असला तरीही पुन्हा लस घ्यावी लागेल

कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर, हाँगकाँग सरकारने उच्च जोखीम असलेल्या लोकांना, विशेषतः ज्यांना आधीच आजार आहे किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांना मागील डोस किंवा संसर्गानंतर किमान 6 महिन्यांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आधी कितीही डोस घेतले असले तरी.

आशियातील अन्य देशांमध्येही वाढताहेत रुग्णसंख्या?

सिंगापूरमध्ये कोविड रुग्णांची संख्या 27 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात 11 हजार 100 होती, जी 3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 14,200 पर्यंत वाढली. याचा अर्थ आठवड्यात सुमारे 30% वाढ. एवढेच नाही तर रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही दररोज सरासरी 102 वरून 133 पर्यंत वाढली आहे. हे आकडे सिंगापूर सरकारचे आहेत.

सरकारचे म्हणणे आहे की ही वाढ अनेक कारणांमुळे असू शकते. जसे की लोकांमध्ये लसीकरणामुळे होणारी प्रतिकारशक्ती हळूहळू कमी होणे. सिंगापूरमध्ये सध्या पसरणारे सर्वात प्रचलित कोविड प्रकार म्हणजे LF.7 आणि NB.1.8. दोन्हीही JN.1 प्रकारातील आहेत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सध्याची कोविड लस बनवण्यासाठी JN.1 प्रकाराचा वापर करण्यात आला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+