सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव, सभापतींची खर्गेसोबत झाली जोरदार खडाजंगी
jagdeep dhankhar vs mallikarjun kharge: राज्यसभेत आज सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. याच कारणावरुन विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. दरम्यान, सभापती जगदीप धनखड व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यात चांगलीच खडाजंगी पहायला मिळाली. आज राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले असून आता सोमवारी कामकाज होणार आहे.

राज्यसभेत काय झाले?
आज सकाळी राज्यसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. विरोधकांनी या मुद्यावरुन जोरदार गदारोळ घातला. अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने काँग्रेसला हे सहन होत नाही, असा आरोप धनखड यांनी केला. त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही प्रतिहल्ला केला. राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाल्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले. आता दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी राज्यसभेचे कामकाज होणार आहे.
काय म्हणाले सभापती धनखड
काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणल्यावर धनखड यांनी जोरदार हल्ला चढवला. आपल्या विरोधात आणला जाणारा अविश्वास प्रस्ताव हा पक्षपाती असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांना उद्देशून ते म्हणाले, तुमची देहबोली पहा. तुम्ही काय म्हणत आहात ते पहा. मी आतापर्यंत तुमचे खूप सहन केले. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण मी दुर्बल नाही. शेतकऱ्याचा मुलगा या पदावर का बसला याचा तुम्ही विचार करत नाही. उलट शेतकऱ्याचा मुलगा या खुर्चीवर बसलेला तुम्हाला पहावत नाही. पण मी दुर्बल नाही. मी या देशासाठी मरणही पत्करेल.
खर्गेंनीही दिले जोरदार उत्तर
सभापती धनखड यांच्या या आरोपानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनीही जोरदार प्रतिहल्ला केला. ते म्हणाले, तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा असाल तर मी सुद्धा एका मजुराचा मुलगा आहे. तुम्ही कायम पक्षपातीपणा करत आला आहात. खर्गे यांच्या या आरोपानंतर राज्यसभेतील वातावरण चांगलेच तापले. विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले.
भाजपने जारी केला व्हिप
या प्रकारानंतर भाजपने राज्यसभेतील आपल्या खासदारांनी व्हिप जारी केला. 16 आणि 17 डिसेंबर 2024 रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन लाईनचा व्हिप जारी करण्यात आला. आता या अविश्वास प्रस्तावावर १४ दिवसांनी निर्णय होणे अपेक्षित आहे. भाजपने व्हिप जारी केल्यामुळे सोमवार व मंगळवारी भाजपचे सर्व खासदार कामकाजात सहभाग घेणार आहेत.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications