Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एकत्र बनवला स्वयंपाक, मग सोबत जेवण, राहुल गांधींनी शेअर केला कोल्हापूरच्या घरातील जेवणाचा VIDEO

नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी शनिवार ता. (5 ) ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राहुल गांधीच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं आणि संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहिले.

दरम्यान राहूल गांधी हे विमानतळावर उतरून ते थेट एका दलित कुटुंबाच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत स्वयंपाक घरात जाऊन जेवण बनवलं. जात, भेदभाव अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा केली. अजय तुकाराम सानदे आणि त्यांची पत्नी अंजना तुकाराम सानदे यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, आजही फार कमी लोकांना माहिती आहे की, दलित कुटूंबातील स्वयंपाक घरात जेवणात काय बनवलं जातं. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विट अंकाऊटवर हा व्हिडीओ शेअर करुन ही माहिती दिली आहे. राहूल गांधी यांनी आपल्या ट्टिटमध्ये म्हटलं आहे की, "शाहू पटोले जी यांनी म्हटल्याप्रमाणे दलित काय खातात हे कोणालाच माहीत नाही, असं या ट्टिटमध्ये म्हटलं आहे.

Rahul Gandhi

"ते काय खातात, ते कसे शिजवतात आणि त्याचे सामाजिक आणि राजकीय महत्त्व याबद्दलच्या कुतूहलाने मी अजय तुकाराम सनदे आणि अंजना तुकाराम सनदे जी यांच्यासोबत एक दुपार घालवली," त्यांनी मला आदरपूर्वक त्यांच्या कोल्हापूरातील घरी बोलावले आणि मला स्वयंपाकघरात मदत करण्याची संधी दिली. आम्ही मिळून हरभऱ्याची भाजी, वांग्याची भाजी आणि तुर डाळ बनवली.

जात आणि भेदभावाच्या मुद्द्यांवर चर्चा

राहूल गांधी पुढे म्हणतात की, पटोल जी आणि सनदे कुटुंबीयांच्या जाती आणि भेदभावाच्या वैयक्तिक अनुभवांबद्दल बोलत असताना आम्ही दलितांच्या जेवणा विषयी जागरूकता नसणे आणि या संस्कृतीचं महत्त्व यावर चर्चा केली. संविधानाने बहुजनांना वाटा आणि अधिकार दिले आहेत. त्या संविधानाचे आपण रक्षण करू, पण समाजात खरी सर्वसमावेशकता आणि समानता तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक भारतीय आपल्या अंत:करणात बंधुभावाची भावना ठेवून प्रयत्न करेल असं या ट्टिटमध्ये म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+