वायनाडमधून काँग्रेसने प्रियांकांना दिले तिकीट, राहुल गांधींनी सोडली होती जागा, विजयाची शक्यता किती?
काँग्रेसने केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा यांना तिकीट जाहीर केले आहे. दुसरीकडे प्रियांका गांधी यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असणार आहे.
15 ऑक्टोबर रोजी दुपारी निवडणूक आयोगाने 13 राज्यांतील 47 विधानसभा आणि 2 लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली होती. यामध्ये केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी यूपीच्या वायनाड आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी रायबरेली ही गांधी घराण्याची पारंपारिक जागा निवडली होती अन् वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडला होता. त्यामुळे येथील जागा रिक्त झाली होती. त्याचबरोबर केरळमध्ये विधानसभेच्या दोन जागांवरही पोटनिवडणूक होत आहे. पक्षाने दोन्ही जागांसाठी उमेदवारही जाहीर केले आहेत.
राहुल म्हणाले होते- मी वायनाडला भेट देत राहीन
17 जून रोजी वायनाडची जागा सोडताना राहुल म्हणाले होते - माझे वायनाड आणि रायबरेलीशी भावनिक नाते आहे. मी गेली ५ वर्षे वायनाडचा खासदार होतो. मी लोकांचे प्रेम आणि समर्थन यासाठी आभारी आहे. प्रियंका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवतील, पण मी वेळोवेळी वायनाडलाही भेट देणार आहे. रायबरेलीशी माझा प्रदीर्घ संबंध आहे, मला पुन्हा त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल याचा मला आनंद आहे, पण हा निर्णय कठीण होता.
झारखंड, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका घोषित
दुसरीकडे निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र-झारखंडसह 14 राज्यांतील 48 विधानसभा आणि 2 लोकसभेच्या जागांसाठीच्या पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघासह 13 राज्यांतील 47 विधानसभा जागांसाठी 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडच्या केदारनाथ विधानसभेच्या जागेवर 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला सर्व निकाल लागतील. विधानसभेच्या 48 जागांपैकी उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 9 जागा आहेत.












Click it and Unblock the Notifications