Budget 2025 Time : आज अर्थसंकल्प सादर होणार! वेळ, थेट प्रक्षेपण आणि अर्थमंत्र्यांचे भाषण कुठे पाहाल?
Budget 2025 Time : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 1 फेब्रुवारी 2025 ला 2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात चालवले जाईल. पहिला भाग 31 जानेवारीला सुरू होईल आणि 13 फेब्रुवारी 2025 ला संपेल. दुसरा भाग 10 मार्चला सुरू होईल आणि 4 एप्रिल 2025 रोजी संपेल. आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली असून अर्थसंकल्पातून सामान्यांना मोठी आशा आहे.

अर्थसंकल्प का महत्वाचा?
देशाचा अर्थसंकल्प हा देशाचे भविष्य असतो. यातून जे सेक्टर मागे आहेत, जो वर्ग मागे आहे त्या वर्गाला आणि क्षेत्राला पुढे नेण्याचे विकासाच्या प्रवाहात आणणे आणि समतोल विकास साधणे महत्वाचे असते. त्यासाठी अर्थसंकल्पातून विकासात्मक दृष्टीने आर्थिक तरतूद केली जाते आणि काही ध्येयधोरणे आखली जातात, त्यानुसार, आर्थिक नियोजन केले जाते. त्यासाठी अर्थसंकल्प महत्वाचा ठरतो.
अर्थसंकल्प 2025 तारीख
1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषण केले जाईल. अर्थमंत्री आगामी आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय वाटप आणि महसूल अपेक्षांची रूपरेषा मांडतील. कनिष्ठ सभागृहातील भाषणानंतर अर्थसंकल्पाची कागदपत्रे राज्यसभेत मांडली जातील.
कधी आणि कुठे पहावे? (Budget 2025 Time)
संसदीय कामकाज संसद टीव्हीवर असेल. अर्थसंकल्पीय भाषणाचे थेट प्रक्षेपणही तेथेच केले जाईल. ते दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीवर तसेच डीडी न्यूजवर देखील उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, संसद टीव्ही त्यांच्या YouTube चॅनेलवर भाषण थेट प्रक्षेपण सुरु राहिल. याशिवाय तुम्ही https://marathi.oneindia.com/ वर बजेट 2025 बद्दल सर्व अपडेट्स देखील पाहू शकता. अर्थसंकल्पीय भाषणावर थेट ब्लॉग येथे सुरु केला आहे.
सीतारामन यांचा रेकॉर्ड
संसदेत सीतारामन यांचे हे आठवे बजेट सादरीकरण असेल आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 3.0 सरकारमधील त्यांचे दुसरे बजेट असेल. मनमोहन सिंग, अरुण जेटली, पी. चिदंबरम, यशवंत सिन्हा आणि मोरारजी देसाई यांसारख्या मागील अर्थमंत्र्यांना एकूण अर्थसंकल्पीय भाषणांच्या बाबतीत मागे टाकून निर्मला सीतारामन यांनी सहा वार्षिक अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्प सादर केले आहेत, हे त्यांचे रेकाँर्ड आहे.












Click it and Unblock the Notifications