छत्तीसगडमध्ये चकमकीत 16 नक्षलवादी ठार, 2 जवान जखमी, परिसरात शोध मोहीम सुरू
Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील केरळपाल भागात शनिवारी 29 मार्च रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 16 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळालं आहे. जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) यांनी शुक्रवारी सुरू केलेल्या संयुक्त नक्षलविरोधी मोहिमेनंतर गोळीबार सुरू झाला होता.
अधिकाऱ्यांच्या माहीतीनुसार, सुकमा पोलिस स्टेशन हद्दीतील केरळपाल भागात नक्षलवाद्यांची उपस्थिती असल्याची माहीती विशिष्ट गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत 16 नक्षलवादी ठार झाले आहेत.यामध्ये दोन सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सुकमाचे एसपी किरण गंगाराम चव्हाण म्हणाले,"आम्हाला आतापर्यंत 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. मोठ्या प्रमाणात एके-47 एसएलआर, आयएनएएसएएस रायफल, इतर शस्त्रे आणि दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे. दोन जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे."
संयुक्त पथक 28 मार्च रोजी शोध मोहिमेसाठी बाहेर पडले होते. त्यानंतर आज (29 मार्च) सकाळपासून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दल सध्या चकमकीच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या जंगलात नक्षलवाद्यांचा कसून शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, चालू ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर सविस्तर निवेदन जारी केले जाईल. छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील सुकमा हा सर्वात जास्त प्रभावित जिल्ह्यांपैकी एक आहे. याठिकाणी यापूर्वी अनेक नक्षलवादी हल्ले झाले आहेत.
#WATCH | Chhattisgarh | Sukma SP Kiran Gangaram Chavan says, "We have recovered 16 bodies of naxals so far. AK-47, SLR, INSAS rifles and other arms & ammunition in large numbers have also been recovered. Two jawans have sustained minor injuries..." https://t.co/47owCj8waf pic.twitter.com/yjnOFrW3CE
— ANI (@ANI) March 29, 2025
दरम्यान शुक्रवारी 28 मार्च रोजी छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) च्या स्फोटात एक जवान जखमी झाला आहे. या जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.












Click it and Unblock the Notifications