Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई, चकमकीत 31 नक्षलवादी ठार, 2 जवान शहीद

Chhattisgarh News : छत्तीसगडमध्ये लष्करी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एकूण 31 नक्षलवादी ठार झाले तर दोन जवान शहीद झाले. ही चकमक बिजापूर राष्ट्रीय उद्यान परिसरात आज झाली.

छत्तीसगढमध्ये होणाऱ्या त्रिस्तरीय पंचायत निवडणुकांच्या अगदी आधी, सुरक्षा दलांनी बिजापूरमध्ये मोठी शोध मोहीम राबवण्यात आली. यादरम्यान, छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.

Chhattisgarh  News 12 Naxalites killed in encounter

शोध मोहिमेदरम्यान लष्करी जवानांनी या चकमकीत 31 हून अधिक नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवले. त्याच वेळी, दोन सैनिक शहीद झाले असून अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. जखमी सैनिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सध्या फरार नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी जवानांची शोध मोहीम सुरुच आहे. बस्तर पोलिसांनी चकमकीत 31 नक्षलवादी ठार झाल्याची खात्री केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+