Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उत्तरप्रदेशात चंदीगढ-दिब्रुगड एक्सप्रेसचा भीषण अपघात, 21 डबे रुळावरून घसरले! 4 ठार, 25 जखमी

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील गोंडा येथे दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली. या एक्स्प्रेसचे 15 डबे रुळावरून घसरले असून या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला तर 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

दुपारी घडला अपघात

चंदिगढ-दिब्रुगढ एक्स्प्रेसला आज दुपारी अडीच वाजता अपघात झाला. या अपघातात रेल्वेचे डबे रुळावरुन घसरले आहेत. त्यात 5 प्रवासी ठार झाले असून घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे.

UP Chandigarh Dibrugarh Express Accident

यासंदर्भात प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गोंडापासून वीस किलोमीटर परिसरात हा अपघात झाला. यात एक डबा पुर्णतः उलटा झाला आहे. घटनास्थळी रुग्नवाहीका पाचारण करण्यात आली आहे.

UP Chandigarh Dibrugarh Express Accident

दोन प्रवाशानी गमावले पाय

दिब्रुगड एक्स्प्रेस (15904) चंदीगडहून दिब्रुगडपर्यंत धावते. गुरुवारी ही ट्रेन चंदीगडहून रात्री 11.39 वाजता निघाली. गुरुवारी दुपारी ही गाडी गोंडा आणि बस्ती दरम्यान झिलाही स्थानकावर आली. तेव्हा गाडी रुळावरुन घसरली. यानंतर रेल्वेच्या बोगी उलटल्या. या भीषण अपघातात एकूण चौघांचा मृत्यू झाला असून दोन प्रवाशांचे पाय कापले गेले आहेत.

सीएम योगींकडून घटनेची चौकशी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील या रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले. याशिवाय जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही सीएमओकडून देण्यात आल्या आहेत.

2 गाड्या रद्द, 11 रेल्वे वळवल्या

गृह आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव गोंडा रेल्वे अपघातावर लक्ष ठेवून आहेत. मदत आयुक्तही समन्वय साधत असून जखमींना उत्तम वैद्यकीय सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मार्गावरील 2 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, 11 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

खिडक्या फोडून प्रवासी आले बाहेर

घटनास्थळी गोंडा-बलरामपूर येथून एसडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रेनचे अनेक डबे रुळापासून 100 मीटरपर्यंत घसरले. एसी कोचच्या डब्यातील खिडक्यांच्या काचा फोडून प्रवासी बाहेर आले. अपघाताचे धक्कादायक फुटेज समोर आले आहे.

यामध्ये दोन प्रवाशांचे पाय चिरलेले दिसत आहेत. जखमी प्रवाशांना खाटेवरून उपचारासाठी नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच डीएम नेहा शर्मा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. जिल्ह्यातील इतर अधिकारीही पोहोचले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+