Chandra grahan 2025: कधी आहे वर्षातील दुसरे चंद्रग्रहण, भारतात दिसणार का? तारीख अन् वेळ घ्या जाणून
Chand Grahan 2025 : दरवर्षी अनेक खगोलीय घटना घडतात, त्यातील मुख्य म्हणजे ग्रहण. सूर्य आणि चंद्रग्रहण दरवर्षी होतात आणि 2025 मध्येही होणार आहेत. 2025 मधील दुसरे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी होणार असून भारतातून ते दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पूर्णिमेला होणार आहे. यावेळी चंद्र लाल रंगाचा दिसेल. ज्याला 'ब्लड मून' असे संबोधले जाते. या चंद्रग्रहणादरम्यान सूतक काळ देखील मान्य असेल, ज्यामुळे धार्मिक विधींवर परिणाम होईल.
2025 मधील पहिले चंद्रग्रहण 14 मार्च रोजी होळीच्या दिवशी झाले होते, परंतु ते भारतात दिसले नव्हते. आता सप्टेंबरमधील हे चंद्रग्रहण भारतासह अनेक देशांमध्ये दिसणार असल्याने उत्सुकता वाढली आहे.

चंद्रग्रहण: खगोलीय आणि धार्मिक दृष्टिकोन
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. यावेळी चंद्र पूर्णपणे किंवा अंशतः झाकला जातो. 7 सप्टेंबर 2025 रोजी होणारे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असेल. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला विशेष महत्त्व आहे. कारण त्याचा प्रभाव राशींवर आणि मानवी जीवनावर पडतो असे मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहणाला अशुभ मानले जाते आणि या काळात काही विधी आणि कार्ये टाळली जातात. हे चंद्रग्रहण भाद्रपद पूर्णिमेला होत असल्याने, पितृपक्षात येणाऱ्या या घटनेमुळे धार्मिक विधींवर परिणाम होईल.
चंद्रग्रहणाची वेळ
7 सप्टेंबर 2025 रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, ज्यामुळे खगोलप्रेमींसाठी हा एक रोमांचक अनुभव असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण रात्री 9:57 वाजता सुरू होईल ते 8 सप्टेंबर दुपारी 12:23 वाजता संपेल. ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक काळ सुरू होतो.
हे चंद्रग्रहण भारतासह युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर, तसेच अंटार्क्टिका आणि आर्क्टिक भागात दिसेल. भारतात चंद्रग्रहण दिसणार असल्याने त्याचा सूतक काळ देखील मान्य असेल, ज्याचा प्रभाव धार्मिक कार्यांवर पडेल. चंद्रग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही विशेष साधनांची गरज नाही; ते उघड्या डोळ्यांनी पाहता येते. तथापि, दुर्बिणीचा वापर केल्यास चंद्राच्या पृष्ठभागावरील तपशील आणि लाल रंग अधिक स्पष्टपणे दिसेल.
ग्रहणाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये?
- गर्भवती महिलांनी ग्रहण काळात विशेष खबरदारी घ्यावी, त्यांनी घराबाहेर पडू नये किंवा ग्रहण पाहू नये.
- ग्रहणाच्या सुतक काळात पूजा थांबवावी.
- ग्रहणाच्या काळात घरातील पूजास्थळ पडद्यांनी झाकून ठेवा.
- ग्रहणाच्या वेळी चुकूनही देव-देवतांची पूजा करू नये.
- ग्रहणाच्या वेळी खाऊ किंवा पिऊ नये.
- ग्रहण संपल्यानंतर, घर आणि पूजास्थळ गंगाजल शिंपडून शुद्ध करावे.
- ग्रहणाच्या सुतक काळात स्वयंपाक करू नये, जेवन करु नये












Click it and Unblock the Notifications