Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजप-काँग्रेसचे टेन्शन वाढले, निवडणूक आयोगाने दोन्हींच्या अध्यक्षांना पाठवली नोटीस

भाजप व काँग्रेसने एकमेकांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप केला होता. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. या दोन्ही तक्रारींची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा या दोघांनाही नोटीस पाठवली आहे. या दोघांनाही 18 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजेपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नेमका काय केला होता भाजपने आरोप

भाजपला संविधान नष्ट करायचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते, यावर भाजपने आक्षेप घेतला होता. त्याशिवाय भारतातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची यादी पाहिलीत तर त्यांच्यात कुठलेच मेरीट नसून फक्त संघाशी निगडीत असणे हाच त्यांच्या निवडीचा आधार आहे, असाही आरोप केला होता. या दोन्ही आरोपांबाबत भाजपने आक्षेप घेतला. तसेच भाजपने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अॅपल कंपनीचा आयफोन आणि बोईंग विमाने ही इतर राज्यांत महाराष्ट्राच्या पैशांतून तयार केली जात आहे, असा आरोप करुन राहुल गांधी हे तरुणांची माथी भडकावण्याचेही काम करत असल्याचा आरोप भाजपने केला निवडणूक आयोगाकडे केला होता.

Central Election Commission Notice to BJP President

नेमका काय होता काँग्रेसचा आरोप

काँग्रेसनेही भाजपविरोधात तक्रार केली आहे. 12 नोव्हेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धनबाद येथे एक भाषण केले होते. या भाषणात त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. या भाषणात त्यांनी खोटी आणि समाजात तेढ निर्माण केलेली विधाने केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस ही अनुसूचित जाती, जमातींच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसने शाह यांच्यावर केला. काँग्रेस एससी, एसटी, ओबीसींचे आरक्षण हिरावून घेणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शाह यांनी केला होता. काँग्रेसने तक्रारीत म्हटले आहे की, शाह यांनी मतदारांची माथी भडकावण्याचा प्रयत्न केला आहे.

काय म्हणतंय निवडणूक आयोग

या दोन्ही तक्रारींची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. भाजप व काँग्रेसच्या अध्यक्षांना नोटीसा पाठवत त्यांचे उत्तर मागितले आहे. त्याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांना काबूत ठेवावे आणि सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश दिलेले होते. या निर्देशांची आठवणही आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पाठवलेल्या नोटीसद्वारे करून देण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+