CBSE class 10th 12th Results 2025 : ठरलं! CBSE दहावी, बारावीचा निकाल 'या' तारखेपूर्वी जाहीर होणार..!

CBSE class 10th 12th Results 2025 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSC) 2025 च्या दहावी आणि बारावीच्या निकालांची घोषणा लवकरच करणार आहे. यंदाच्या सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या निकालांची घोषणा 8 मे पूर्वी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 13 मे 2024 रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते.

यासंदर्भात इंडिया टीव्हीने सुत्रांच्या हवाल्यानुसार, वृत्त दिले आहे. सीबीएसई परिक्षेनंतर पेपर तपासणीची प्रक्रीया जवळपास पुर्ण झाली आहे. आता या परिक्षांचा निकाल कधी लागतो याचीच विद्यार्थ्यांना प्रतिक्षा आहे.

CBSE class 10th 12th Results 2025

सांगायचे झाल्यास परिक्षेनंतरही काही प्रक्रिया असतात, त्यात ज्यावेळी पुर्ण पेपर तपासले जातात, त्यानंतर त्याचा निकाल तयार केला जातो. हा निकाल तयार करण्याच्या प्रक्रीया अंतीम टप्प्यात आली की, निकाल जाहीर करण्यापूर्वी, बोर्ड सामान्यतः परीक्षा नियंत्रकासोबत बैठक घेऊन निकाल कधी लावायचा याची तारीख ठरवते.

निकाल लावण्यासंदर्भात ही बैठक अद्याप झालेली नाही. ही बैठक होताच सीबीएसई तारखांची घोषणा करेल. प्राप्त माहितीनुसार, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकाल लवकर लागावा यासाठी प्रयत्नशील आहे. आता या निकालाची तारीख आणि वेळ लवकरच जाहीर होईल. यासंदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरही मिळणार आहे.

किती आहेत परिक्षार्थी?

  • CBSC दहावी बोर्ड परिक्षेसाठी यंदा 24 लाख 12 हजार परिक्षार्थी बसले होते. तर बारावीच्या परिक्षेला 17 लाख 88 हजार परिक्षार्थी बसले होते.
  • जवळपास 44 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्या आहेत.
  • CBSC 10 वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान झाल्या CBSC 12 वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या होत्या.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी वरील वेबसाइट्सना भेट देऊन सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीचे निकाल डाउनलोड करू शकतील.

कुठे पाहता येईल निकाल?

  • cbse.gov.in
  • Result.cbse.nic.in
  • cbse.nic.in
  • cbseresults.nic.in
  • digilocker.gov.in

या वेबसाइट्सवर तुम्ही निकाल पाहू शकता.

असा पाहा तुमचा निकाल

  • सर्वात आधी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी सीबीएसई दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  • आता "निकाल" किंवा इंग्रजीत Result विभागात जा आणि येथे "दहावी निकाल (10 th Result) 2025" लिंकवर क्लिक करा.
  • 12 th चे विद्यार्थीही याच वेबसाईटवर भेट देऊन निकाल पाहू शकतात. त्यांनी फक्त 12th Result या ऑप्शनवर जायचे आहे.
  • आता, तुमचा रोल नंबर, शाळेचा क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन यासारखे तपशील प्रविष्ट करा.
  • यानंतर तुमचा सीबीएसई दहावीचा निकाल स्क्रीनवर दिसेल. असाच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही निकाल दिसेल.
  • निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+