'थ्री एडिएट्स' आठवतोय ना? त्या चित्रपटातील शाळेला आत्ताशी मिळाली मान्यता; हे मोठ्ठं कारण आलं समोर

तुम्हाला 'थ्री एडिएट्स' आठवतोय ना? हो, तोच आमिर खानचा... त्या चित्रपटात दाखवलेल्या शाळेला आत्ताशी सीबीएसईची मान्यता मिळाली. ही मान्यता मिळविण्यासाठी या शाळेला तब्बल दोन दशके संघर्ष करावा लागला. त्यानंतर ही मान्यता मिळाली. ही शाळा लेहमध्ये निसरम्य वातावरणात आहे. थ्री एडिएट्सनंतर ती चांगलीच लोकप्रियही झाली आहे. आता या शाळेला आत्तापर्यंत का मान्यता मिळाली नाही? त्याचे कारणही समोर आले आहे.

School in Three Idiots

कुठे व कशी आहे शाळा?

थ्री एडिएट्समध्ये दाखवलेली शाळा लेहमधील थंड हवेच्या ठिकाणी आहे. तेथील वातावरणही अगदीच रमनीय आहे. त्या शाळेचे मिफाम पेमा कॉर्पो (१५२७-१५९२) या महान विद्वानाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. ड्रुक पद्मा कार्पो स्कूल असे शाळेचे नाव आहे. ही शाळा २४ वर्षे जुनी आहे. आता तुम्ही म्हणाल, पद्मा कॉर्पो म्हणजे काय? तर पद्मा कॉर्पो म्हणजे पांढरे कमळ.

मान्यता का नव्हती?

या शाळेला आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर राज्य शिक्षण मंडळाची म्हणजेच (JKBOSE) ची मान्यता होती. परंतु शाळेला सीबीएसईकडून मान्यता हवी होती. ती मिळविण्यासाठी स्थानिक सरकारचे'ना-हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) हवे होते. मात्र ते आत्तापर्यंत न मिळाल्यामुळे सीबीएसईची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता, शाळेला सीबीएसई मान्यता मिळाली आहे. यावर्षी दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची वाटही पाहत आहेत.

प्राचार्यांनी सांगितले कारण?

या शाळेच्या प्राचार्या मिंगुर अंगमो यांनी शाळेला सीबीएसईची मान्यता का मिळाली नाही ते सांगितले. त्या म्हणाल्या, "आमच्याकडे सर्व आवश्यक सुविधा आणि अध्यापन पद्धती आधीच उपलब्ध होत्या. फक्त जम्मू आणि काश्मीर राज्य शिक्षण मंडळाकडून एनओसी न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली होती. परंतु आता, सीबीएसई मान्यता मिळाल्याने आमच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग सोपा झाला आहे."

शाळेचा होणार विकास

या शाळेने आता ११ वी आणि १२ वी पर्यंत शिक्षण देण्याची योजना आखली आहे. २०२८ पर्यंत शाळेत ११-१२ वी वर्ग सुरू करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी या शाळेने आत्तापासून नवनवीन उपक्रम सुरु केले आहे. '३ इडियट्स' या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे ही शाळा प्रसिद्ध झाली होती. जिथे चित्रपटातील एका दृश्यात एका विद्यार्थ्याला विजेचा धक्का बसतो. हे दृश्य आता शाळेच्या 'आयकॉनिक वॉल'चा एक भाग बनले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+