Celebi aviation:पाकला मदत करणाऱ्या तुर्कीविरुद्ध भारत सरकारची कारवाई; Celebi Airportचा परवाना रद्द
Turkish airport ground handling company CELEBI : भारताविरुद्ध लष्करी कारवाईत पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीयेला आता त्यांची चूक चांगलीच भोवणार आहे. कारण, मोदी सरकार सातत्याने तुर्कीयेवर कारवाई करत आहे.
एकामागे एक दणके देत भारत सरकारच्या वतीने तुर्कियेवर कारवाई केली जात आहे. अशातच, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने 'सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड'ची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

सेलेबी एअरपोर्ट ही तुर्कियेची कंपनी
सेलेबी एअरपोर्ट ही एक तुर्की कंपनी आहे. जी भारतात ग्राउंड हँडलिंग सेवा प्रदान करते. ही कंपनी मुंबई, दिल्ली, हैदराबादसह अनेक प्रमुख विमानतळांवर बॅगेज हँडलिंग, रॅम्प सर्व्हिस, कार्गो हँडलिंग सारख्या सेवा प्रदान करते. दरम्यान, भारत सरकारने तुर्कीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत, नागरी विमान वाहतूक ब्युरोने तुर्की विमानतळाच्या ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्विसची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिस भारतातील 8 विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.
मुंबईत शिवसेनेच्या करण्यात आले होते आंदोलन
अलिकडेच, मुंबईतील शिवसेना शिंदे गटाच्या वतीने 13 मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर निदर्शने केली आणि मुंबई विमानतळाने तुर्की कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसशी असलेले संबंध संपुष्टात आणावेत अशी मागणी केली. मुंबई विमानतळावरील सुमारे 70 टक्के ग्राउंड ऑपरेशन्स सेलेबी एअरपोर्ट हाताळते. यामध्ये प्रवासी सेवा, भार नियंत्रण, उड्डाण ऑपरेशन्स, कार्गो आणि पोस्टल सेवा, गोदाम आणि पूल ऑपरेशन्स यांचा समावेश आहे. या आंदोलनानंतर तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत अखेर भारत सरकारच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications